आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागा द्वारे देण्यात येणारा २०२०-२१ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट रासेयो महाविद्यालय पुरस्कार श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व कार्यक्रम अधिकारी प्रा.गुरुदास दादाजी बलकी यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार पाटकर सभागृह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबई येथे ना.उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ राजमोहम्मद खेरानी, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी यांनी स्वीकारला. यावेळी २०१९-२० चा सर्वोत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार महाविद्यालयाचा रासेयो स्वयंसेवक विशाल मनोहर शेंडे यांनी मंत्री महोदयांच्या हस्ते स्वीकारला.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर हा पुरस्कार आणि सन्मान कार्यक्रम अधिकारी प्रा.बलकी इतर सहायक कार्यक्रम अधिकारी तसेच रासेयो स्वयंसेवकांनी मागील तीन वर्षात हाती घेऊन पूर्णत्वास नेलेल्या विविध उपक्रमाचे फलित आहे, हा सन्मान महाविद्यालयासोबतच प्रत्येक सक्रिय स्वयंसेवकांचा ही आहे असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ वारकड यांनी काढले. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर चे कुलगुरू मा. डॉ एस.एन. पातूरकर, एस. एन. डी.टी. विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू डॉ उज्वला चक्रदेव, क्षेत्रिय निदेशालाय पुणे चे युथ ऑफिसर अजय शिंदे, राज्यस्तरीय रासेयो सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू व अमित गुप्ता, रासेयो राज्यसंपर्क अधिकारी डॉ प्रशांतकुमार वनंजे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी यांची श्री शिवाजी महाविद्यालयात नियुक्ती २०१६ मध्ये इतिहास विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून झालेली आहे, तसेच प्रा. बलकी हे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून २०१८ पासून कार्यरत आहेत. मागील तीन वर्षातील म्हणजेच २०१८-१९,२०१९-२०,२०२०-२१ या कालावधीमध्ये त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव व राष्ट्रभक्ती जोपासणारे अनेक उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून हाती घेतले. त्यामध्ये जलसंवर्धनासाठी जलव्यवस्थापन, जलपुनर्भरण, वनराई बंधारे, मतदान व मतदार जनजागृती साठी पथनाट्ये, जनजागृती रॅली, सिंगल युझ प्लॅस्टिक फ्री इंडिया साठी जनजागृती, तसेच एचआयव्ही एड्स जनजागृती उपक्रमाअंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम, सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळा, तंबाखूमुक्ती तसेच नियंत्रणासाठी जनजागृती, सुदृढ भारत सक्षम भारत अंतर्गत कार्यक्रम, कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती, कोविड-१९ च्या काळात गरजूंना मोफत १२००० मास्क वितरण, तसेच सोशल मीडियावरून जनजागृती, स्वच्छता अभियान अंतर्गत बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय, तसेच राजुरा शहरात स्वच्छता मोहीम, वर्धा नदी स्वच्छता मोहीम असे विविध जागरूकता कार्यक्रम राबविले, सोबतच जिल्हास्तरीय युवक-युवती नेतृत्व विकास शिबिर, आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक, अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक कार्यक्रम घेतले.
प्रा. बलकी यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय विविध शिबिरात भाग घेतला, यामध्ये राष्ट्रीय एकता शिबिर रांची, गुवाहाटी, हजारीबाग, नागपूर अशा झारखंड, आसाम, महाराष्ट्र अशा विविध राज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाविद्यालय व गोंडवाना विद्यापीठाचे व राज्याचे नावलौकिक केले, सोबतच आव्हान-२०१९ आपत्ती व्यवस्थापन शिबिरातही सहभागी झालेत, प्रा. बलकी यांनी ही राज्याचे नेतृत्व करत राष्ट्रीय, राज्यस्तरीय शिबिरात संघनायक म्हणून महाराष्ट्राचा संघ, विद्यापीठाचा संघ घेऊन रांची, गुवाहाटी आसाम, हजारीबाग झारखंड, आव्हान २०१९ नांदेड, पूर्व प्रजासत्ताक दिवस पथसंचलन नागपूर इथे सहभाग घेऊन एक भारत श्रेष्ठ भारत असे विविध उपक्रम राबविले. व महाराष्ट्र राज्याचा व गोंडवाना विद्यापीठाचे नावलौकिक केले.
२०२० या वर्षी राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन सुब्बई येथे केले यामधे संपूर्ण महाराष्ट्रातील २७७ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता, सोबतच दरवर्षी विशेष शिबिराच्या आयोजनांतून ग्रामीण भागात जनजागृती चे कार्य सुरू आहे, या सर्व उपक्रमाची दखल घेत या पुरस्कारासाठी प्रा. बलकी व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर ची निवड करण्यात आली होती.
मागील तीन वर्षांच्या रासेयो प्रवासात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे रासेयो संचालक प्रा. डॉ. नरेश मडावी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ खेरानी, संस्थेचे संचालक मंडळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील रासेयो सहकार्यक्रम अधिकारी डॉ सारिका साबळे, रासेयो समितीचे सदस्य डॉ चेतना भोंगाडे, प्रा. विठ्ठल आत्राम, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री अनिल बावणे, श्रीमती लताबाई बोबडे तसेच महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी, शिबिराच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका असलेले टेंबुरवाही व सुब्बई येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद गावातील नागरिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाविद्यालयातील आजी/माजी रासेयो स्वयंसेवक या सर्वांची या राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराच्या प्रवासात मदत व सहकार्य मिळाले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.