- शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे यांनी वाढदिवसाप्रसंगी जोपासली सामाजिक बांधिलकी
- स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके आणि फळांचे वाटप
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
युवकांनी स्वतःची जबाबदारी व जाणीव ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासली, तर समाजासोबत स्वतःचीही उन्नती होते. आज समाजात अनेक वंचित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांकडे कौशल्य आणि नवनिर्मितीची ऊर्जा आहे. त्यातून अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात. त्यासाठी सर्वानी आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकीची भावना जोपासली पाहिजे. असे प्रतिपादन शिवसेना उपतालुका प्रमुख, रामपूर ग्राम पंचायत सदस्य रमेश झाडे यांनी केले.
वाढदिवस आला कि केक कापून त्याने आपले तोंड रंगविण्याची व मनसोक्त पार्टी करण्याची पद्धत आजच्या तरुण पिढीत आहेत. परंतु आपलेही समाजाशी काही घेणे देणे असते हे लक्षात ठेवत शिवसेना उपतालुका प्रमुख, रामपूर ग्राम पंचायत सदस्य रमेश झाडे यांनी आपला वाढदिवस अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके आणि फळे वाटप करून साजरा केला.
रमेश झाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज रामपूर येथील स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके आणि फळांचे वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय घडामोडीविषयी माहिती मिळावी याकरिता जनरल नॉलेज आणि संगणकीय ज्ञान मिळावे याकरिता MS-CIT माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकूडे, शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव चापले, युवा सेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, विभाग प्रमुख अजय सकिनाला, युवा सेना सरचिटणीस स्वप्नील मोहुर्ले, युवा सेना शाखा प्रमुख अतूल खनके, चेतन मालेकर, हनुमान मालेकर, अशोक बोबडे, राजु काटम, श्रीनिवास कारंगीला, तिरुपती काटम, रुपेश गोहणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.