आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. निनाद येरणे यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने धडक दिल्याने ॲड. निनाद येरणे व कोरपना न्यायालयातील सरकारी वकील ॲड. प्रीती आमटे हे जखमी झाले. या धडकेत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान कार क्र. MH 34 BR 6669 ने कोरपना येथून राजुरा कडे परत येत असतांना चंदनवाही ते पांढरपोवनी दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार क्र. MH31CM 5382 या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक झाली.
या धडकेत ॲड. निनाद येरणे यांच्या पायाला दुखापत झाली असुन त्यांच्यासह कार मधे असलेल्या कोरपना येथिल सरकारी वकील ॲड. प्रीती आमटे ह्यांनाही दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन पोलीस कारवाई सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.