Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेडिमेड कापड दुकानाला लागली भीषण आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेडिमेड कापड दुकानाला लागली भीषण आग कपडे, फर्निचर जळून खाक लाखों रुपयांचे नुकसान आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - मेन रोडवरील स्नेहदी...
  • रेडिमेड कापड दुकानाला लागली भीषण आग
  • कपडे, फर्निचर जळून खाक
  • लाखों रुपयांचे नुकसान
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
मेन रोडवरील स्नेहदीप गारमेंट्स या रेडिमेड कापड दुकानाला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर कपडे जळून खाक झाले. हे नुकसान ४० ते ४५ लाखाच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील मुख्य बाजारातील मेन रोड वर राकेश नामेवार यांच्या स्नेहदीप गारमेंट्स या रेडिमेड दुकानाला मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याची बाब आजुबाजूच्या काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने दुकानाचे मालक राकेश नामेवार, पोलीस व नप अग्निशमन दलाला आगीसंदर्भात माहिती दिली. राजुरा व बल्लारपूर येथील अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. पहाटे पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत रेडिमेड कपड्यांसह दुकानातील पूर्ण फर्निचरही जळून भस्मसात झाले.
वीज पुरवठा खंडीत
दुकानाला लागलेल्या आगीनंतर वीज वितरण कंपनीला शहरातील वीज पुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे वीज पुरवठा सुरू होईस्तोवर नागरिकांना उकाड्यामुळे घराबाहेर येऊन थांबावे लागले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. खुप वाईट घटना. आधीच कोरोनामुळे व्यापार नाही, आता हे अश्या घटनेमुळे व्यापारी हवालदील होईल.

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top