Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर व जिवती येथे आरोग्य मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर व जिवती येथे आरोग्य मेळावा खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे करणार उद्घाटन आरोग्य मेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन धनराजसिंह शेखा...


  • गडचांदूर व जिवती येथे आरोग्य मेळावा
  • खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे करणार उद्घाटन
  • आरोग्य मेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना व जिवती तालुक्यातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर व शासकीय आश्रम शाळा जिवती येथे 24 एप्रिल ला आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात फिजिशियन, शल्य चिकित्सक, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, दंत चिकित्सक, नाक, कान, घसा तज्ञ, आयुष व युनानी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध प्रकारच्या रोगाची तपासणी करून निदान केले जाणार आहेत. या शिबिरात रुग्णांना गोल्डन कार्ड देण्यात येईल.
या शिबिराचे उद्घाटन  ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे 24 एप्रिल ला खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे, अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे राहील, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, कोरपनाच्या नगराध्यक्षा नंदाताई बावणे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गट विकास अधिकारी  दिलीप बैलमवार, गट शिक्षणाधिकारी आनंद धुर्वे,बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश जाधव, मुख्याधिकारी डॉ विशाखा शेळकी हे सुद्धा उपस्थित राहतील.
या आरोग्य मेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र कनाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय गाठे (गडचांदूर) व डॉ राजुनंद गायकवाड (कोरपना), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेम्भे यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top