Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नप कर्मचाऱ्याच्या वारसदारांना ५० लक्ष रुपयाचा धनादेश सुपूर्द
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नप कर्मचाऱ्याच्या वारसदारांना ५० लक्ष रुपयाचा धनादेश सुपूर्द कोरोना काळात कर्तव्यावर असताना झाला होता मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स ...
  • नप कर्मचाऱ्याच्या वारसदारांना ५० लक्ष रुपयाचा धनादेश सुपूर्द
  • कोरोना काळात कर्तव्यावर असताना झाला होता मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
नगर परिषद राजूरा मध्ये कार्यरत कर्मचारी सुधाकर शंकर कोंडावार यांचा कोविड-19 कोरोना साथ रोगामध्ये कर्तव्यावर असतांना दिनांक 2 मे 2021 रोजी मृत्यू झाला होता. मृतक सुधाकर कोंडावार यांच्या पात्र वारसदारांना महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग तर्फे रुपये पन्नास लक्ष्य सानुग्रह सहायक अनुदान मंजूर करण्यात आले. 
नगर परिषदेच्या सभागृहात त्यांच्या पत्नी श्रीमती संध्या सुधाकर कोंडावार यांना पन्नास लक्ष्य रुपयाचा धनादेश नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी बांधकाम सभापती आनंद दासरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार तसेच नप प्रशासकीय अधिकारी विजय जांभूळकर, अभिनंदन काळे, पाणी पुरवठा अभियंता संकेत नंदवंशी, लेखापाल अश्विन कुमार भोई, संगणक अभियंता ज्ञानेश सोनवाने, मिळकत व्यवस्थापक अक्षय सूर्यवंशी, सतीश देशमुख, वीरेंद्र धोटे, संजय जोशी, मनोज राजगडे, बाबूराव गोगुलवार व इतर नप कर्मचारी उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top