Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सात शाळकरी अल्पवयीन मुलींचा विनयभंग -शिक्षकास अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सात शाळकरी अल्पवयीन मुलींचा विनयभंग शिक्षकास अटक... जिवती तालुक्यातील हिरापूर येथील जिप शाळेतील प्रकार  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रति...
  • सात शाळकरी अल्पवयीन मुलींचा विनयभंग
  • शिक्षकास अटक...
  • जिवती तालुक्यातील हिरापूर येथील जिप शाळेतील प्रकार 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून मुलींची छेड काढणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिवती तालुक्यातील हिरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ए. के. राठोड 49 असे आरोपित शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर शिक्षक पेपर तपासण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींना कार्यालयात बोलावून छातीला कुरावळणे व छातीला हात लावणे, तोंड लावणे असा प्रकार मागील एक वर्षांपासून करीत होता. याच प्रकारचे कृत्य शाळेत शिकणाऱ्या इतर सहा मुलींसोबत केल्याचे तक्रारीत नमुद आहे. मुलींचा तक्रारीवरून जिवती पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी अपराध क्र. 35/2022 नुसार भादंवि कलम 354(अ), 376(अ) 376(2)(एन) सह बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्याच्या कलम 4, 6, 8,12 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. समोरील तपास अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात, गडचांदुर येथील बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top