Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रामपूर येथे खुल्या प्लॉटवर असलेल्या लाकूड कचऱ्याला लागली अचानक आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपूर येथे खुल्या प्लॉटवर असलेल्या लाकूड कचऱ्याला लागली अचानक आग शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवा सेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यां...

  • रामपूर येथे खुल्या प्लॉटवर असलेल्या लाकूड कचऱ्याला लागली अचानक आग
  • शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवा सेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
रामपूर येथे नागनाथ घोटेकर यांच्या घराजवळ असलेल्या प्लॉटवरील लाकूडफाट्याला आज अचानक आग लागली. आगीचा भडका अचानक झाल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये ही आग पसरू शकत होती मात्र शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे आणि युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांनी शेजाऱ्याच्या मदतीने ती आग विझवायला सुरवात केली. प्लॉटच्या शेजारील घराची बोरवेल सुरु करून पाईप द्वारे व गच्चीवरील पाण्याच्या टाकीतून  पाणी घेऊन बालटीने आगीवर टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे आणि युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांच्या समयसूचकतेमुळे मोठी होणारी हानी टळली. यामुळे नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी मदतीसाठी गणपत चौधरी, भारत पिंपळशेडे, सौ गणपती चौधरी यांनी सहकार्य केले.
रामपूर गावात दररोज विजेचा लपंडाव सुरु असतो, सुदैवाने विजेचा पुरवठा सुरु असल्याने बोरवेल सुरु करून पाइपद्वारे पाणी टाकण्यात आले. अन्यथा अग्निशमन गाडीला बोलवावे लागले असते हे येथे विशेष. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top