Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रोपवनातील दोन सोलर सबमर्सीबल मोटर पंप, केबल व मेन स्टार्टरसह चोरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रोपवनातील दोन सोलर सबमर्सीबल मोटर पंप, केबल व मेन स्टार्टरसह चोरी सुमठाना येथील मिश्र रोपवन कक्ष क्र 166 मध्ये चोरट्यांची वाकडी नजर आमचा विद...

  • रोपवनातील दोन सोलर सबमर्सीबल मोटर पंप, केबल व मेन स्टार्टरसह चोरी
  • सुमठाना येथील मिश्र रोपवन कक्ष क्र 166 मध्ये चोरट्यांची वाकडी नजर
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
मौजा सुमठाना येथील बिट कक्ष क्र 166 मधील मिश्र रोपवनाला पाणी देण्याकरिता सोलर पंप लावले असून अज्ञात चोरटयांनी केबल व मेन स्टार्टर सह चोरी झाल्याची माहिती उजेडात आली आहे. 
सुमठाना बीटाचा वनरक्षक मिरा राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले कि, मौजा सुमठाना येथील बिट कक्ष क्र 166 मधील मिश्र रोपवनाला पाणी देण्याकरिता लावलेले आहे. रोपवनाला पाणी देण्याकरिता दोन मजूरही लावलेले आहे. मजुरासह गस्ती दरम्यान रोपवनामध्ये लावलेल्या ठिकाणी सोलरला लावलेली जुनी वापरती दोन HP ची सबमर्सिबल मोटर पंप, 200 फुट केबल वायर व मोटार चालु करण्याचा मेन स्टार्टर बॉक्स दिसुन आले नाही एकूण अंदाजे तीस हजार रुपये किमतीचे सामान अज्ञात चोरांनी चोरून नेले. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली असून समोरील तपास पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top