आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजूरा -
कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचे आयशर वाहन विरूर पोलिसांनी पकडून बारा जनावरांची सुटका केली आहे. ही कारवाई विरूर स्टेशन पोलिसांनी मौजा सुब्बई चौकात पंचासह नाकाबंदी करीत असताना केली. पोलिसांनी वाहन चालक बालाजी बाबुराव दुर्गे वय 31 वर्षे रा. येरगव्हाण, विधीसंघर्ष बालक जुबेर रसुन शेख वय 17 वर्षे रा. गडचांदुर यांना ताब्यात घेतले असून सादिक शेख रा गडचांदुर हा फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोठारी-तोहोगाव-लाठी-विरूर-कोष्टाला-लक्कडकोट मार्गे जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती उजेडात आली होती. सपोनि राहुल चौहान, पोशी अशोक मडावी यांनी पंचासमक्ष नाकाबंदी केली. अश्यातच एक कंटेनर आयचर वाहन त्यांना येताना दिसली संशयित आयशर वाहन वाहन क्र. TS- 20 T- 6902 ची तपासणी केली असता या वाहनात अवैधरित्या निर्दयीपणे कोंबून असलेले बारा नग बैल आढळून आले. पोलिसांनी सदर जनावरे कुठे नेत आहे असे विचारले असता सदर जनावरे सादिक शेख रा. गडचांदुर यांचे असुन तेलंगानात नेत असल्याचे सांगीतले यावरून सदर जनावरे वाहनात कोंबुन, निर्दयतेने वाहतुक करित कत्तली करिता नेण्याचे उद्देशाने तेलगांणा राज्यात नेत असल्याचे निष्पन्न होताच दोन आरोपीतांना ताब्यात घेतले मात्र एक आरोपी फरार झाला. पोलिसांनी आरोपीतांकडून आयशर वाहन वाहन क्र. TS- 20 T- 6902 अंदाजे किंमत 15 लाख रुपये व बारा मग बैल किंमत 96 हजार रुपये असा एकूण 15 लाख 96 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी क्रूर कृत्य कलम 5(अ)(1)(5)9, 11 महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम 1976 सह कलम 11(1) (ड) प्राण्याना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960 गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.