Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: निर्धार, कठोर परिश्रम, सातत्य या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब करा - डॉ. प्रकाश नगराळे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
निर्धार, कठोर परिश्रम, सातत्य या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब करा - डॉ. प्रकाश नगराळे जागतिक आरोग्य दिन निमित्त नेफडो तर्फे डॉक्टर, आरोग्य सेवि...

  • निर्धार, कठोर परिश्रम, सातत्य या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब करा - डॉ. प्रकाश नगराळे
  • जागतिक आरोग्य दिन निमित्त नेफडो तर्फे डॉक्टर, आरोग्य सेविका, रुग्णवाहिका चालक, स्वच्छताकर्मी यांचा सत्कार
  • स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा कर्मवीर दादासाहेब कन्नमवार ग्रंथालय स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश जाधव, सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा तथा माजी जिप सदस्य यांची उपस्थिती होती. सत्कारमूर्ती म्हणून डॉ. प्रकाश एम. नगराळे, तालुका आरोग्य अधिकारी राजुरा, डॉ. मानविता बी. भंडारी, एमबीबीएस, नागपूर, उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील विद्या परचाके, आरोग्य सेविका, खुशाल लकडे, रुग्णवाहिका चालक (108 अत्यावश्यक सेवा), मंजुषा टेकाम, स्वच्छता कर्मी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ज्ञानेश सोनवाने, संगणक अभियंता, नप राजुरा, अक्षय सूर्यवंशी, कर व प्रशासकीय सेवा, नप राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो, डॉ. सारिका साबळे  आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्ष पूजन करून उज्वला जयपुरकर यांनी पर्यावरण गीत सादर केले. बादल बेले यांनी वृक्षप्रतिज्ञा घेतली. मान्यवरांचा सत्कार सन्मानचिन्ह, श्रीफळ व वृक्ष भेट देऊन करण्यात आला. सत्कारमूर्ती डॉ. नगराळे यांनी आपल्या मनोगतातून निर्धार,कठोर परिश्रम, सातत्य या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब करून यशस्वी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले . स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ज्ञानेश सोनवाने यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना परिस्थितीची जाणीव ठेवून तणावमुक्त अभ्यास करीत ज्ञानाचे आदान प्रदान करा व स्वतःची क्षमता ओळखा, यशस्वी व्यक्तीचे आदर्श व मार्गदर्शन घ्यावे असे प्रतिपादन केले. अक्षय सूर्यवंशी यांनी स्पर्धापरीक्षे संदर्भात असलेल्या प्रश्न, समश्या यांचे निराकरण केले. आपले लक्ष साध्य करण्यासाठी अभ्यासाचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. अध्यक्षीय मनोगतातून अविनाश जाधव यांनी स्पर्धा परीक्षेला जाताना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे असे प्रतिपादन केले व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य सेविका, रुग्णवाहिका चालक, स्वच्छता कर्मी यांचा सत्कार हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गुंडावार यांनी केले. प्रास्ताविक अल्का सदावर्ते, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विभाग नागपुर अध्यक्षा यांनी केले. तर आभार स्वरूपा झंवर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, सदस्य तसेच कर्मवीर दादासाहेब कन्नमवार ग्रंथालय स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र यांनी अथक परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top