Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सावत्र मुलाने केला धारदार शस्त्राने आईवर हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सावत्र मुलाने केला धारदार शस्त्राने आईवर हल्ला शेतीच्या हिस्सा वाटणीवरुन झाला वाद राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना अविनाश रामटेके - आम...

  • सावत्र मुलाने केला धारदार शस्त्राने आईवर हल्ला
  • शेतीच्या हिस्सा वाटणीवरुन झाला वाद
  • राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर स्टे. (राजुरा) - 
स्वताच्या हिश्याला जास्त जमिनीचा वाटा यावा या लालसेपोटी आपल्याच सावत्र भाऊ व सावत्र आईस संपविण्यासाठी कट रचुन धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करुन गंभीररीत्या जखमी केल्याची घटना राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली.
विरुर पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथील रतन दाऊ ताकसांडे यांना वीस एकर शेतजमीन व घर आहे. व दोन  वर्षापुर्वी  आजाराने मृत्यू झाला ,त्याला दोन पत्नी असुन पहील्या पत्नीला तीन मुले व दुसऱ्या पत्नीला एक मुलगा आहे. दुसरी पत्नी आपल्या मुलाला घेउन तेलंगाणा राज्यात वास्तव्य करीत आहे. मात्र शेतीच्या वाटपावरुन या कुटूंबात पुर्वीपासुनच वाद सुरु होता. 
डोंगरगाव येथे दरवर्षी गुडीपाढवाच्या मुहुर्तावर सामान्य फंडाचे पैसे गोळा करुन वाटप करण्यात येते. त्यासाठी लक्ष्मी रतन ताकसांडे वय 48 व त्याचा मुलगा  व्यंकटेश ताकसांडे हे डोंगरगावला आले. या फंडा करीता सावत्र आई व मुलगा गावात आल्याने त्यांना जिवे मारण्याचा कट त्यांचे सावत्र भाऊ दीपक ताकसंडे वय 35 व फुलवंत ताकसंडे वय 38 या दोघांनी रचला, काल सकाळी 9 वाजताच्या सुमारास फराळाच्या निमित्याने सावत्र मायलेकना आपल्या घरी बोलवुन शेत जमीनीचा वाद घातला. दरम्यान घरीच असलेले धारदार शस्त्राने मुलावर वार करण्याचा पयत्न केला. परंतु प्रसंगावधाने घरातुन बाहेर जाउन आपला जिव वाचविला मात्र दीपक व फुलवंत यांनी सावत्र आईला बेदम मारहान करुन धारदार शस्त्राने मानेवर व चेहऱ्यावर वार करुन गंभीरकरित्या जखमी केले. घराच्या बाजुला रस्त्यावर ती कोसळली. तेंव्हा ती मदतीची याचना करीत होती. तीचा किंचाळण्याचा आवाज बाहेर आल्याने गावकरी घराजवळ जमा झाले. आरोपींनी हातात शस्त्र घेउन या ठिकाणी कोणीही यायचे नाही नाहीतर तुम्हालाही मारुन टाकीन म्हणुन धमकविण्याचा प्रयत्न करीत होता त्यामुळे कुणीही जवळ गेले नाही. तेंव्हा तेथील काही नागरीकांनी विरुर पोलिस ठाण्याला फोनवरुन माहीती दिली. ताबडतोब विरुर पोलिस ताफा घटनेस्थळी दाखल झाला. जखमीला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना अटक करुन भादंवि १८६० कलम ३०७, ५०४, ५०६, ३४, शस्‍त्र अधिनियम १९५९, कलम २५, ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विरुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली भुजंग कुळसंगे, सचिन खेरे, मडावी नरगेवर, सूर्यभान मार्कंडे, विजू मुंडे, दीपाली हे करीत आहे. या घटनेने राजुरा तालुक्यातील डोंगरगाव या गावात कमालीचे दहतशीचे वातावरण निर्माण झाली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top