Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पहाटेच्या सुमारास बिबट्या घरात घुसला अन्...
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पहाटेच्या सुमारास बिबट्या घरात घुसला अन्... कुटूंब झोपलं असताना त्यांच्या शेजारीच होता बिबट्या वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश शशी ठक्कर - ...

  • पहाटेच्या सुमारास बिबट्या घरात घुसला अन्...
  • कुटूंब झोपलं असताना त्यांच्या शेजारीच होता बिबट्या
  • वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील उसेगाव इथं भगवान आवारी यांच्या घरात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या घुसला होता. सकाळी ९ च्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात यश आले. काही दिवस देखरेखीत ठेवून लवकरच त्याची मोकळ्या अधिवासात मुक्तता केली जाईल, अशी माहिती चंद्रपूर वन विभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली आहे.
खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावलीपासून सात किलोमीटर अंतर असलेल्या उसेगाव येथे आवारी यांच्या घरी चार जण घरात झोपले होते. पहाटे शौचालयासाठी भगवान यांची आई सिंधुबाई उठल्या. तेव्हा खाटेच्या खाली काहीतरी असल्याची चाहूल लागली. नेमके काय आहे ? हे बघण्यासाठी त्या गेल्या. मात्र, त्याच वेळेस सिंधूबाई यांची सून शशिकला बाई यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
शशिकला प्रतिकार करत स्वत:चा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडल्या. खाटेखाली बिबट असल्याचं कुटुंबाच्या लक्षात आलं. घरात बिबट शिरल्याची माहिती उपसरपंच सुनील पाल यांना दिली गेली. पाल यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सावली येथील वनरक्षकानी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सकाळी वनविभागाची टीम आणि इको प्रोचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
अवघ्या काही वेळातच या बिबट्याला पकडण्यात यश आले. मागील काही दिवसांपासून हा बिबट गावातील कोंबड्या, बकऱ्यांवर ताव मारीत होता. तो जेरबंद झाल्याने गावकऱ्यांनी सूटकेचा श्वास घेतला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top