Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कुलरचा शॉक लागून पाच वर्षीय युग चा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुलरचा शॉक लागून पाच वर्षीय युगचा मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स मूल - मूल येथील युग महेश जेंगठे या पाच वर्षीय बालकांचा कुलरचा शॉक ला...

  • कुलरचा शॉक लागून पाच वर्षीय युगचा मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मूल -
मूल येथील युग महेश जेंगठे या पाच वर्षीय बालकांचा कुलरचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्यांची दुर्दैवी घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे जेंगठे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. युग हा मूल येथील सेंट अॅनेस स्कुलला केजी 2 मध्ये शिकत होता.
एक दिवसापूर्वीच महेश जेंगठे यांनी कुलर लावला होता. आज दुपारी 12 वाजताचे दरम्यान युग खेळत-खेळत कुलरचे स्टॅंडला जावून पकडला व तीथेच शॉक लागून जागेवरच पडला. ही बाब घरच्यांच्या लगेच लक्षात येताच युगला मूल येथील उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला  मृत घोषीत केले. युग यांचे निधनाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी महेश जेंगठे यांचे घरी गर्दी केली.
मूल येथील प्रतिष्ठीत युवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी महेश जेंगठे पदाधिकारी असून त्यांना दोन मुले आहेत. युग हा लहान मुलगा होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top