Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वस्तात AC-कूलर खरेदीची आज शेवटची संधी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वस्तात AC-कूलर खरेदीची आज शेवटची संधी Amazon समर अप्लायंसेज सेलचा शेवटचा दिवस आमचा विदर्भ (A) ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर समर अप्लायंसेज से...

  • स्वस्तात AC-कूलर खरेदीची आज शेवटची संधी
  • Amazon समर अप्लायंसेज सेलचा शेवटचा दिवस
आमचा विदर्भ (A)
ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर समर अप्लायंसेज सेल सुरू आहे. तुम्ही जर उन्हाळ्याच्या निमित्ताने नवीन एसी, पंखा अथवा कूलर खरेदी करण्याचा विचार करत असल्यास हा सेल तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. सेलमध्ये या प्रोडक्ट्सवर ६० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. एअर कूलर, एअर कंडीशनर, पंखे स्वस्तात खरेदी करण्याची तुमच्याकडे आज शेवटची संधी आहे. समर अप्लायंसेज सेलचा आज शेवटचा दिवस आहे. ९ एप्रिल २०२२ ला हा सेल समाप्त होणार आहे. Amazon Sale मध्ये स्वस्तात मिळणाऱ्या या प्रोडक्ट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Symphony Hicool i Personal Air Cooler
Symphony Hicool i Personal Air Cooler हा अ‍ॅमेझॉन सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहे. ३१ लीटर कॅपेसिटीसह येणाऱ्या या कूलरला १५ टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. हा कूलर फक्त ८,८९९ रुपयात उपलब्ध आहे.

Bajaj PX Personal Air Cooler
Amazon Sale मध्ये बजाज कंपनीचा हा ब्रँडेड कूलर ३२ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ३६ लीटर वॉटर टँक क्षमता असलेला हा कूलर रुमला लवकर थंड करतो. हाय-स्पीड फॅनसह येणाऱ्या या कूलरला तुम्ही ६,१९९ रुपयात खरेदी करू शकता.

Voltas Inverter Split AC
Voltas Inverter Split AC ४२ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा ५ स्टार रेटिंगसह येणारा स्पलिट एसी Amazon Sale मध्ये ३९,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

Carrier Inverter Split AC
४ इन १ कूलिंगसह येणाऱ्या Carrier Inverter Split AC वर सेलमध्ये सर्वाधिक सूट मिळत आहे. हा एसी ४६ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर या स्पलिट एसीला तुम्ही फक्त ३६,५०० रुपयात खरेदी करू शकता. दरम्यान, Amazon वर सुरू असलेला समर अप्लायंसेज सेल लवकरच समाप्त होणार आहे. ९ एप्रिलला हा सेल समाप्त होणार असल्याने ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट्स त्वरित खरेदी करावे लागतील. तुम्ही Amazon इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जावून ऑफर्सची माहिती घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर शानदार डील्स मिळतील. मात्र, खरेदी करण्यापूर्वी प्रोडक्ट व साइटची विश्वासार्ह्यता नक्की तपासा. इतर गोष्टी तपासूनच प्रोडक्ट खरेदी करा.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top