Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'नीट'ची तारीख ठरली नीट प्रवेश परीक्षा १७ जुलै रोजी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'नीट'ची तारीख ठरली नीट प्रवेश परीक्षा १७ जुलै रोजी  परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू विद्यार्थ्यांना ६ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज...

  • 'नीट'ची तारीख ठरली
  • नीट प्रवेश परीक्षा १७ जुलै रोजी 
  • परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू
  • विद्यार्थ्यांना ६ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
पुणे -
देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणारी नीट प्रवेश परीक्षा (NEET 2022) यंदा राष्ट्रीय पातळीवर १७ जुलै रोजी होणार (NEET Date 2022) असून, त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिली आहे.
एमबीबीएस, बीडीएस, बीएएसएम, बीएमएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीट प्रवेश परीक्षेद्वारे होतात. यंदाची नीट प्रवेश परीक्षा यंदा १७ जुलै रोजी दुपारी दोन वाजता ५४३ शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, मराठीसह एकूण १३ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या परीक्षेत एमसीक्यू पद्धतीने एकूण २०० प्रश्न विचारण्यात येणार असून, परीक्षेसाठी एकूण तीन तास २० मिनिटांचा कालावधी दिला आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ६ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी सात मेपर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करायची आहे. हॉल तिकिटाबाबतची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परीक्षेच्या सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.nta.ac.in या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन एनटीएच्या प्रशासनाने केले आहे.

'जेईई मेन'साठी लवकरच अर्ज
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांत बारावीची परीक्षा यंदा उशिराने होत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन (JEE Main) परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) 'जेईई मेन' परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेचे पहिले सत्र २१ एप्रिल ते चार मे या कालावधीत, तर दुसरे सत्र २४ ते २९ मे या कालावधीत होणार होते. आता सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या सत्रातील परीक्षा २० ते २९ जूनदरम्यान होईल. दुसऱ्या सत्रातील परीक्षा २१ ते ३० जुलै दरम्यान होणार आहे. 'जेईई मेन'च्या पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आता संपली आहे; तसेच दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top