Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: WCL बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
WCL बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - वेकोलिच्या बल्ला...

  • WCL बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
वेकोलिच्या बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरात धक्कादायक व दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान वेकोलीच्या बल्लारपूर काॅलरी 3&4 रेल्वे सायडिंग कडून येणाऱ्या रेल्वे ने धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सूत्राच्या माहितीनुसार सदर युवकाचे नाव दिलीप बल्ला वर्मा वय 27 वर्ष असून तो बल्लारपूर शहरातील डॉ. आंबेडकर वार्ड येथील निवासी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली असून या संदर्भातील पुढील तपास सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top