Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा गावातील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही प्रलंबित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा गावातील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही प्रलंबित अनेक लोकप्रतिनिधिंनी उदघाटनाचे नारळ फोडले काम मात्र काम शून्य अनेक वेळा ...

  • नांदा गावातील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही प्रलंबित
  • अनेक लोकप्रतिनिधिंनी उदघाटनाचे नारळ फोडले काम मात्र काम शून्य
  • अनेक वेळा मागणी करूनही लोकप्रतिनिधी कडून नागरिकांना केवळ आश्वासनच
  • रत्नाकर चटप यांनी मुंबई येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन दिले निवेदन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा गावातील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही प्रलंबित आहे. अमलनाला धरणाचा श्रोत असलेल्या या नाल्यावर पुलाची व सोबतच मोठा बंधारा बांधण्याची अत्यंत गरज आहे. अनेक वेळा मागणी करूनही लोकप्रतिनिधी कडून नागरिकांना केवळ आश्वासनच मिळत आहे. 
मागील अनेक वर्षापासून येथील नागरिक सतत वाहणाऱ्या नाल्यावर पुल नसल्यामुळे मोठा त्रास सहन करत आहे. पावसाळ्यात पाणीची पातळी वाढल्यामुळे रस्ता पूर्णतया बंद होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारे शेती साहित्य, बैलबंडी, खत, शेतात कामाला लागणारे मजूर पलीकडे नेता येत नसल्याने शेतातील पूर्ण कामं ठप्प पडतात. पाण्याचा प्रवाह मोठ्या असल्याने नाला ओळांडणाच्या प्रयत्नात अनेक नागरिकांचा व जनावरांचा अनेक अपघातही झालेले आहे. नांदा गावालगत वाहणारा हा नाला बारमाही असून येथे बंधारा-पुल झाल्यास जवळपास 200 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार . याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार. शिवाय बिबी, नांदा, नोकरी येथील नागरिकांना कमी वेळात व कमी खर्चात तालुका ठिकाणी पोहोचण्यास मदत होईल.
या पावसाळ्याच्या आधी पुलाचे काम सुरू होईल अशी आशा होती. परंतु अद्याप असे काहींच होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना व कामगारांना या वर्षीही पावसाळ्यात पुरामुळे ताटकळत राहावे लागणार आहे असे वाटत आहे. अद्यापही पुलाच्या बांधकामास सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांत मोठी निराशा व्यक्त होत आहे.
या संदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव तथा नांदा ग्राम पंचायत चे माजी सदस्य रत्नाकर चटप यांनी मुंबई येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे रत्नाकर चटप यांनी सांगितले.
नांदा-आसन या रस्त्यावर पुल बांधकामाचे अनेक लोकप्रतिनिधिंनी उदघाटनाचे नारळ फोडले काम मात्र केले नाही असे आरोप येथील नागरिक करीत आहे. लवकरच ग्रामपंचायत, जिल्हापरीषद  व पंचायत समीतीच्या निवडणूका होणार आहे. पुल केंव्हा होईल हे सांगणे कठीण आहे, पण मताच्या राजकारणाची जमा बेरीज करुन लवकरच बाकी राजकीय पक्ष आपले-आपले दावे घेऊन पुढे येतील व हा मुद्दा तापणार हे मात्र नक्की दिसत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top