Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सिमेवर लढणाऱ्या जवानाचे असेही सामाजिक भान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सिमेवर लढणाऱ्या जवानाचे असेही सामाजिक भान डेबू सावली वृदाश्रमात साजरा केला लग्नवाढदिवस, आर्थिक मदत आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - र...

  • सिमेवर लढणाऱ्या जवानाचे असेही सामाजिक भान
  • डेबू सावली वृदाश्रमात साजरा केला लग्नवाढदिवस, आर्थिक मदत
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा सास्ती येथील विजय तुळशीराम शेंडे हे सध्या भारत बांगलादेश सिमेवर कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत देशाच्या अनेक भागात सिमेवर संरक्षण कार्यत सेवा दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विजय ने सामाजिक भान ठेवून आपला जन्मदिवस, मुलांचे जन्मदिवस सामाजिक दायित्व निभावून साजरे केले आहेत. यावेळी चक्क आपल्या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने त्याने पून्हा सामाजिक उपक्रम राबऊन डेबू सावली वृदाश्रम चंद्रपूर येथील वृध्द माता, पिता यांच्या सोबत आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रपरिवार यांना सोबत घेऊन लग्नवाढदिवस साजरा केला. येथील वृध्दांना फळे, मिठाई वाटप केली, अन्नदान केले आणि चेकद्वारे फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात आर्थिक मदत केली.
या प्रसंगी फौजी विजय शेंडे यांनी आपल्या धर्मपत्नी शिल्पा शेंडे यांच्या निरपेक्ष प्रेम आणि त्यागामुळेच आपण देशाच्या सिमेवर अढळपणे काम करीत असून तीच्या सहकार्यातूनच आपण सामाजिक ऋण फेडण्यासाठी वेळोवेळी असे उपक्रम घेऊन सामाजिक दायित्व पार पाडीत आहे आणि यापुढेही असेच काम करीत राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. या प्रसंगी यंगचांदा ब्रिगेड चे चंद्रपूर शहर प्रमुख राहुल मोहुर्ले, शेंडे, मोहुर्ले कुटुंब, मित्रपरिवार आणि डेबू सावली वृदाश्रमाचे वृध्द मिता पिता, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top