आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
कॅटरिंग चे काम करणारा विकास रमेश तिवारी रा. अंबादास वार्ड, सोमनाथपुर यांनी पोलिसात तक्रार दिली कि ते 24 एप्रिलला एका कार्यक्रमाच्या ऑर्डरकरिता मस्जिद वॉर्डात सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास गेले. रात्री 9 वाजताच्या दरम्यान कोहपरा आणण्यासाठी त्यांनी मानव वाटेकर यांना गाडी मागितली, त्यांनी त्याचे भाऊजी कैलास बापुराव नक्षिणे रा. कृष्ण नगर चंद्रपूर यांची मोटार सायकल क्र. MH 34-BJ-2662 होंडा कंपनीची SP शाईन किंमत अंदाजे 50 हजार ही गाडी दिली. ती गाडी घेऊन घराकडे गेल्यावर मोटरसायकलची चाबी न काढता रोडवर उभी करून घरात गेल्यावर जेव्हा घरातून बाहेर आला तेव्हा त्याला गाडी दिसली नाही. गाडीचा शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.