डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी अग्नीशस्त्रासह एका सराईत गुन्हेगाराला दुर्गापूर परिसरात ताब्यात घेतले असून ह्या गुन्हेगाराकडून होऊ घातलेल्या गुन्ह्यास अटकाव करण्यात यश आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त सूचनेनुसार दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रमोद रामलाल सुर्यवंशी वय 36 वर्षे हा सराईत गुन्हेगार अवैधरीत्या अग्निशस्त्र (पिस्तुल) घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीवरून एक पथक तयार करण्यात आले व त्या इसमाची संपुर्ण पार्श्वभूमी तपासण्यात आली असता सदर इसम हा सराईत गुन्हेगार असल्याचे व तो मोठी घटना घडविणार असल्याची शक्यता गृहीत धरून स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे ह्यांच्या नेतृत्वात सापळा रचून उमेश टेलर्स दुर्गापुर या दुकानासमोरून नमुद इसम जात असताना दिसला त्यास थांबवून पंचाचे उपस्थितीत चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रमोद रामलाल सुर्यवंशी वय 36 वर्षे रा उर्जानगर नेरी वार्ड क्रमाक 6 दुर्गापुर चंद्रपुर असे सांगीतले. आरोपीची ओळख पटताच त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कडून पँटच्या कमरेमध्ये देशी बनावटीचा एक माऊझर/अग्नीशस्त्र मिळुन आला तसेच त्याचे पॅटचे खिश्यात 5 जिवंत काडतुसे आढळून आले. त्यास सदर अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्याने कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगीतले.
स्थानिक गुन्हे शाखेने जप्त देश बनावटीचे पिस्तुल व 5 जिवंत काडतुस ह्यांचा पंचनामा केला त्याप्रमाणे आरोपीच्या ताब्यातून एक देशी बनावटीचा लोखंडी माउजर/अग्नीशस्त्र किंमत 20 हजार रुपये, 5 जिवंत काडतुस किंमत 5 हजार रुपये असा एकुण 25 हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्तपंचनामा कार्यवाही करून ताब्यात घेतला.
नमुद इसमास अग्नीशस्त्र व जिवत काडतुस बाळगण्याबाबत कारण विचारले असता पोस्टे दुर्गापुर मध्ये काही दिवसाआधि एका इसमाणे खूनाचा प्रयत्न केला होता व त्याप्रकरणातील आरोपी काही दिवसापुर्वी कारागृहातुन बाहेर आला होता व तो नमुद हत्यार बाळगणरे इसमास वारंणवार जिवे ठार मारीण असे धमकावित होता म्हणुन नमुद हत्यार बाळगत असुन धमकावणाऱ्या इसमाची अग्नीशस्त्रने गोळी घालुन जिवे मारण्याच्या तयारीत असल्याचे कबूल केले.
सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे, सपोनी जितेंद्र चौबड़े, सपोनी संदिप कापडे, पोउपनि अतुल कावडे, पोहचा प्रकाश बल्की, पोना अनुप डागे, जमिर पठाण, नितेश महात्मे, मिलींद चव्हाण, पोशि मयुर येरणे, प्रमोद कोटनाके यांचे पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.