Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राज्यातील सीमा तपासणी नाके बंद होणार?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राज्यातील सीमा तपासणी नाके बंद होणार? अंमलबाजवणी कशी करायची यासाठी अभ्यास गटाची स्थापना आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स मुंबई - राज्यातील चेक...
  • राज्यातील सीमा तपासणी नाके बंद होणार?
  • अंमलबाजवणी कशी करायची यासाठी अभ्यास गटाची स्थापना
आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स
मुंबई -
राज्यातील चेक पोस्ट लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने राज्याला या संदर्भात तिसरे परिपत्रक पाठवले आहे. त्यानुसार राज्य परिवहन विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सगळे कर ऑनलाईन झाल्यानंतर आता चेक पोस्ट बंद करण्याची तयारी सुरू आहे. 
केंद्र सरकार कडून आलेल्या तिसऱ्या परिपत्रका नंतर आता राज्यातील चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात ‘अभ्यास गटाची’ स्थापना करण्यात आली आहे. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर गृहविभागानं अभ्यास गटाची स्थापना केली आहे.  3 महिन्यात या अभ्यास गटाला आपला अहवाल शासनाला द्यावा लागणार आहे. तसे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहे.
लवकरच राज्यातील चेकपोस्ट बाबात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर सीमा तपासणी नाके, म्हणजेच चेक पोस्ट बंद करण्याबाबत अभ्यासगट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा अभ्यासगट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होती आणि त्यावरच्या उपाययोजनांच्या बाबतीच अभ्यास करुन एक अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर चेंक पोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

अभ्यास गट काय करणार?
अभ्यास गटाद्वारे चेकनाके बंद करण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अभ्यास करेल. त्याचप्रमाणे जर चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय झाला, तर त्याची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे करायची, याचाही अहवाल सादर करावा लागणार आहे. यामुळे पुढील 3 महिन्यांत राज्यातील सर्व चेकपोस्ट बंद होण्याची शक्यता आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top