Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दुचाकीची अमोरासमोर धडक एक ठार तर दोन जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुचाकीची अमोरासमोर धडक एक ठार तर दोन जखमी आमचा विदर्भ - ब्यूरी रिपोर्ट्स चिमूर - नेरी-खांबाडा मार्गावर दोन दुचाकीमध्ये अमोरासमोर झालेल्या धड...

  • दुचाकीची अमोरासमोर धडक
  • एक ठार तर दोन जखमी
आमचा विदर्भ - ब्यूरी रिपोर्ट्स
चिमूर -
नेरी-खांबाडा मार्गावर दोन दुचाकीमध्ये अमोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवार दिनांक 25 एप्रिलच्या सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान झाला.
ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव जानी येथील देवेंद्र जगदीश गुरु  वय 51 वर्षे हे लग्नकार्य आटोपून नेरी गावाकडे जाण्यासाठी दुचाकी क्र. एमएच-34 सीए-2987 ने येत होते तर विरुद्ध दिशेने नेरीवरून दुचाकी क्र. एमएच-34 एएल-4392 या दुचाकीने जात होते. खांबाडा गावाजवळच दोन्ही दुचाकीची अमोरासमोर धडक झाली यात यात देवेंद्र गुरु यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे हलविण्यात आले. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top