Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तुळसीनगर, राष्ट्रवादी नगर आणि वृंदावन नगर येथे अभ्यासीकेसह 50 लक्ष रुपयांचा निधी देणार - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तुळसीनगर, राष्ट्रवादी नगर आणि वृंदावन नगर येथे अभ्यासीकेसह 50 लक्ष रुपयांचा निधी देणार - आ. किशोर जोरगेवार तुळसी नगर विकास समितीचा चौथा वर्ध...

  • तुळसीनगर, राष्ट्रवादी नगर आणि वृंदावन नगर येथे अभ्यासीकेसह 50 लक्ष रुपयांचा निधी देणार - आ. किशोर जोरगेवार
  • तुळसी नगर विकास समितीचा चौथा वर्धापण दिन साजरा
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
वाढत्या लोकसंख्येसह चंद्रपूर शहराचाही विस्तार होत असल्याने अनेक नविन वस्त्या निर्माण झाल्या आहे. या वस्त्यांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. तुळसीनगर, राष्ट्रवादी नगर आणि वृंदावन नगर येथील सोयी सुविधांसाठी आपण 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असून नागरिकांनी जागा उपलब्ध करुन दिल्यास येथे अभ्यासिकेसाठीही आपण निधी देऊ असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
तुळसीनगर वासियांच्या वतीने तुळसीनगर विकास समिती तर्फे चौथा वर्धापण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला तुळसीनगर विकास समितीचे अध्यक्ष ए.एन देवताळु, उपाध्यक्ष दौलत रामटेके, सचिव अनिल देवतळे, कार्याध्यक्ष अनिल माथनकर, सहकार्याध्यक्ष दिवाकर पाल, कोष्याध्यक्ष राहुल निमगडे, संघटक नशीम, प्रसिध्दी प्रमुख रविंद्र सोनेकर, सहसंघटक वरारकर, कमलेश तोडे, रमेश वनकर, यंग चांदा ब्रिगेडच्या तुळशीनगर संघटिका शांता धांडे, यंग चांदा ब्रिगेडचे संघटक दिनेश इंगळे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर शहरातील अनेक भागांचा अद्यापही अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामुळे या भागांचा विकास व्हावा या करिता आपले प्रयत्न सुरु आहे. कोरोना काळात आमदारांच्या निधीमध्ये मोठी कपात करण्यात आली होती. असे असतांनाही विविध विभागा अंतर्गत शहराच्या विकासासाठी आपण मोठा निधी उपलब्ध केला आहे. या निधीतुन दुर्लक्षित राहिलेल्या भागांचा विकास केल्या जात आहे. इंदिरा नगर, क्रिष्णा नगर, संजय नगर, बाबुपेठ या शेवटच्या..........

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top