Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'त्या' देशी दारू दुकानाला ७२ तासात टाळे ठोका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'त्या' देशी दारू दुकानाला ७२ तासात टाळे ठोका नगरसेवक पप्पू देशमुख यांचा मनपाला अल्टिमेटम निवासी बांधकामची परवानगी घेत वाणिज्य वापर ड...


  • 'त्या' देशी दारू दुकानाला ७२ तासात टाळे ठोका
  • नगरसेवक पप्पू देशमुख यांचा मनपाला अल्टिमेटम
  • निवासी बांधकामची परवानगी घेत वाणिज्य वापर
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जगन्नाथबाबा मठाजवळील देशी दारु दुकानाचा मुद्दा गाजत असतानाच निवासी बांधकामाकरिता परवानगी घेऊन नियमबाह्य वाणिज्य वापर करीत थेट दारुदुकान थाटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या देशी दारु दुकानाला मनपाने ७२ तासाच्या आत टाळा ठोकावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनविकास सेनेच्या अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला आहे. 
तात्याजी किसन जुमडे व बालाजी किसन जुमडे यांच्या सर्वे क्रमांक २६/१ मधिल भूखंड क्रमांक २ वर  दिनांक २८/१०/२००२ रोजी तत्कालीन चंद्रपूर नगरपालिकेने बांधकामाची परवानगी दिली होती. निवासी बांधकामाकरिता जुमडे यांचा नकाशा मंजूर केला होता. मात्र तात्याजी  जुमडे यांचे वारसदार प्रविण जुमडे व इतर ४  यांनी आपल्या इमारतीचा वाणिज्य वापरासाठी सर्रास उपयोग सुरू केला आहे. वाणिज्य वापराची मालमत्ता कराची पावती  तयार करून जुमडे यांनी
निवासी कामासाठी मंजूर असलेल्या बांधकाममध्ये वाणिज्य वापर सुरु केला आहे. त्यामुळे जगन्नाथ बाबा नगर मधील ‘त्या’ वादग्रस्त देशी दारू दुकानासह प्रवीण जुमडे यांच्या इमारतीमधील सर्व इतर सर्व दुकानांना टाळे मारण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ७२ तासाच्या आत 'त्या' वादग्रस्त देशी दारू दुकानाला टाळे ठोकावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देशमुख यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट कारभाराबद्दल पुराव्यासह गौप्यस्फोट करणार
चंद्रपूर मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियम डावलून अनेक देशी दारू दुकान, वाईन शॉप, यांच्या स्थानांतरणाला नियमबाह्य मंजुरी दिली आहे. अनेक दुकानांचे स्थानांतरण करताना नियम धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत.अनेक बिअर शॉपीलासुद्धा नियम धाब्यावर बसवून मंजुरी दिली. या सर्व प्रकरणात पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. अशा सर्व प्रकरणा बाबत पुढील काही दिवसांत पुराव्यासह गौप्यस्फोट करणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top