Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कास्ट भांडारातील लाखों रुपयांचा लाकूड जळून खाक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कास्ट भांडारातील लाखों रुपयांचा लाकूड जळून खाक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स तळोधी बाळापुर - तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या...

  • कास्ट भांडारातील लाखों रुपयांचा लाकूड जळून खाक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
तळोधी बाळापुर -
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या सावरगांव कास्ट भांडारातील अंदाजे 30 ते 40 बिट लाकूड जळून खाक खाक झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. परिसरातून गेलेल्या विद्युत विभागाच्या हायव्होल्टेज तारांच्या झालेल्या स्पार्किंगमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  या कास्ट भांडारातील वनविभाग व सोसायटीचे लाखों रुपयांचे लाकूड जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
विद्युत विभागाच्या 33 केवी व 11 केवीचे इलेक्ट्रिक तार एकमेकांच्या जवळ असून त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या सुद्धा या तारांना स्पर्श करतात यामुळे स्पार्किंग होऊन आग लागलेली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येते आहे
आगीची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ नागभीड व सिंदेवाही येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण केले. उशिरापर्यंत अग्निशमन दल, वन विभागाचे फायर मॅन, मजुरांनी, परिसरातील पीआरटीच्या सदस्यांनी व स्वाब नेचर केअरच्या सदस्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत लाखों रुपयांचा लाकूड जळून खाक झाला. यावेळी तळोधी बाळापुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर. धोंडणे, नागपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, तळदेव गोविंदपुरचे क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड,  नेरीचे सहाय्यक रासेकर, वनरक्षक एस.बी.पेंदाम, एस.एस.गौरकर,व वनरक्षक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top