Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ईद आणि अक्षय तृतीया सण शांततेने साजरे करावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ईद आणि अक्षय तृतीया सण शांततेने साजरे करावे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांचे जनतेला आवाहन पोलीस स्टेशन गडचांदूर येथे शांतता सम...

  • ईद आणि अक्षय तृतीया सण शांततेने साजरे करावे
  • उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांचे जनतेला आवाहन
  • पोलीस स्टेशन गडचांदूर येथे शांतता समीतीची बैठक संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
पोलीस स्टेशन गडचांदूर येथे शांतता समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांनी समोर येत असलेल्या ईद आणि अक्षय तृतीया सण शांततेने साजरे करण्याचे आवाहन स्थानीय नागरिकांना केले आहे.
पोलीस स्टेशन गडचांदुरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात सध्याची राजकारणी स्थिती लक्षात घेता राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना धैर्य बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम समाजाची ईद व हिंदू समाजाची अक्षय तृतीया सण एकत्र येत असल्याने दोन्ही समाजातील लोकांना एकमेकांच्या धर्माचा आदर करत शांतीने आपले सण साजरे करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी केले. सर्व धर्म समभावची भावना जोपासण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. कोणीही समाजात तेढ निर्माण करणारे कसले ही वाद घालू नये. सोबतच सोशल मीडियावर कोणीही खोट्या अफवा पसरवून सामाजिक शांतता भंग करू नये. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या खऱ्या खोट्या संदेशावर खात्री केल्याशिवाय कोणीही अफवा पसरवू नये अशी ताकीद दिली.
या शांतता समितीच्या बैठकीत न नगराध्यक्षा सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, नप चे काँग्रेस गट नेते विक्रम येरणे, राकाँ चे अरुण निमजे, गडचांदुर व्यापारी मंडळ चे अध्यक्ष हंसराज चौधरी, राहुल उमरे, सचिन भोयर, मनोज भोजेकर, दुधगवळी सर, करमनकर सर, ख्वाजा भाई, इर्शाद अली, अहमद भाई, आशिष देरकर, मुमताज अली, गौतम धोटे, शैलेश लोखंडे आदी अनेक मान्यवर मंडळी आणि पत्रकार उपस्थित होते. गडचांदुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, एपीआय नागलोत, एएसआय सुनील बोरीकर, तिवारी, प्रशांत शेंडे, धर्मराज मुंडे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top