Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अचानक लागलेल्या आगीमुळे निलगिरी प्लांट जळून खाक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अचानक लागलेल्या आगीमुळे निलगिरी प्लांट जळून खाक सिंधी येथील सरस्वती ढुमने यांचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान बघा व्हिडीओ  आमचा विदर्भ - ब्यु...

  • अचानक लागलेल्या आगीमुळे निलगिरी प्लांट जळून खाक
  • सिंधी येथील सरस्वती ढुमने यांचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान
  • बघा व्हिडीओ 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे आज दुपारच्या सुमारास ग्रामपंचायत परिसरास लागून असलेल्या शेत शिवारात अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि यात सिंधी ग्रामपंचायतचे उपसरपंच रामभाऊ ढुमने यांच्या आई सौ. सरस्वती आबाजी ढुमने यांच्या मालकीच्या निलगिरी प्लांट मधिल निलगिरी वृक्ष पुर्णपणे जळून खाक झाले आहेत. या आगीत ढुमने यांच्या २ एकर जमीनीवरील निलगिरी जळून खाक झाले आहेत. यात त्यांचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते.
सदर आगीचे वृत्त समजताच ढुमने कुटुंब आणि स्थानिक गावकरी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र कडक उन्हात हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यानंतर धानोरा साजाचे पटवारी यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली असून ते घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करणार असल्याची माहीती मिळाली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top