- मोबाईल वरून बोलत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून युवकाचा मृत्यू
- मोबाईल फोनवर संभाषण करताना सावधानता बाळगा! गडचांदूर पोलिसांचे आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नांदा फाटा येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये असलेल्या गडचांदूर निवासी अंजू सेठ यांच्या इमारतीमध्ये किरायाने राहात असलेले मूळ मुक्काम बल्लारपूर येथील जोगदंड बबलू मेश्राम वय 35 वर्ष हे 5 अप्रैल ला साडे आठ ते रात्री अकरा ते बारा च्या सुमारास फोनवरून तिसऱ्या मजल्यावर बोलत असताना अचानक त्यांचा तोल गेला व जागीच त्यांचा मृत्यू झाला. मृतक अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये ऑरेंज सिटी या कंत्राटदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात त्यांची पत्नी व 6 वर्षाची मुलगी असा परिवार असून अकस्मात त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती गडचांदूर चे थानेदार सत्यजित आमले यांना होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.