- महावितरण तर्फे ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू
- नागरिकांची विद्युत कार्यालयावर धडक
- महावितरण तर्फे भर उन्हाळ्यात नागरिकांची झोप उडविण्याचे काम
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना सदर भारनियमनाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मागील २-३ दिवसांपासून विद्युत विभागातर्फे रात्री १० ते २ च्या दरम्यान भारनियमन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नारंडा, लोणी व पिपरी येथील नागरिकांनी सदर भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे याकरिता गडचांदूर येथील विद्युत वितरण विभागाच्या कार्यलयावर भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात धडक दिली.
विद्युत विभागाचा रात्रीचे भारनियमन करणारा हा नियम अकलेचे तारे तोडणारा असून चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान हे देशातून सर्वाधिक जास्त आहे व सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे अतिशय जास्त प्रमाणात गर्मी असून रात्री भारनियमन असल्यामुळे नागरिकांची झोप उडविण्याचे काम विद्युत विभागातर्फे सुरू आहे. दिवसा भारनियमन न करता रात्री भारनियमन सुरू केले आहे. विद्युत विभागातर्फे सदर निर्णय न रद्द झाल्यास आपण या विरोधात तीव्र आंदोलन करू असे आशिष ताजने यांनी सांगितले. यावेळी लोणी येथील उपसरपंच अविनाश वाभीटकर, पिपरी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ तिखट, सागर झाडे, प्रवीण हेपट, महेश बिल्लोरिया, ज्ञानेश्वर आवारी व पिपरी, लोणी व नारंडा येथील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.