Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सास्ती कोळसा खाणीत अपघात पाच कामगार जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सास्ती कोळसा खाणीत अपघात पाच कामगार जखमी आमचा विदर्भ  - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा -  वेकोलीच्या सास्ती ओपनकाष्ट कोळसा खाणीत आज दिनांक 8 एप्रिल...

  • सास्ती कोळसा खाणीत अपघात
  • पाच कामगार जखमी
आमचा विदर्भ  - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा - 
वेकोलीच्या सास्ती ओपनकाष्ट कोळसा खाणीत आज दिनांक 8 एप्रिल ला दुपारी एक ट्रक पलटी होऊन त्यात पाच कामगार जखमी झाले. यापैकी चार कामगारांना नागपुर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
दुपारी दोनच्या दरम्यान ड्रिल विभागाचा ट्रक चार कामगारांना ड्रिल मशीनचे काम करण्यासाठी कोळसा खाणीत घेऊन जात असताना वळणावर ट्रक उलटला आणि चारही चाके वर झाली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने जखमी कामगार निलेश हटवार, अरुण मांढरे, नूर खान, तिलक संभोज आणि चालक रामदास पेटकर यांना क्षेत्रीय दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र काही कामगारांची स्थिती बघता चालक व्यतिरिक्त इतर चार कामगारांना नागपुर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मात्र चारही कामगारांची स्थिती गंभीर नाही, असे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top