Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा-गडचांदूर-कोरपना व गडचांदुर-नांदा-आवारपूर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा-गडचांदूर-कोरपना व गडचांदुर-नांदा-आवारपूर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा ईबादुल सिद्दीकी यांची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रत...








  • राजुरा-गडचांदूर-कोरपना व गडचांदुर-नांदा-आवारपूर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
  • ईबादुल सिद्दीकी यांची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
राजुरा-गडचांदूर-कोरपना व नांदा-आवारपूर च्या मुख्य रोडवर खड्डे पडले असून वाहनधारकांना अतोनात त्रास होत आहेत. या मार्गावर दिवस रात्र वाहतूक सुरु असते. रोडवरील गड्ड्यामुळे अनेकदा अपघात घडून प्राणहानी व वित्त हानी सुद्धा झाली आहे. तेव्हा संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे व महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे   यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातुन केली आहेत.
निवेदनाची दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ कारवाई करण्याबाबत  28 मार्च ला कळविले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top