- स्मार्ट ग्राम बिबी येथे नृत्याविष्कारला उत्स्फूर्त प्रतिसाद
- फॅशन शो, मदर-डॉटर नृत्य व समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन संपन्न
- कार्यक्रमाला एलआयसी व अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाउंडेशनचे लाभले सहकार्य
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
स्मार्ट ग्राम, बिबी येथे नृत्याविष्कारचे आयोजन नुकतेच पार पडले. त्यात फॅशन शो, आई-मुलगी नृत्य व समूहनृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मदर-डॉटर नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती देरकर व वाणी देरकर यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक अश्विनी कोहळे यांनी व तृतीय क्रमांक मोनिका शेखावत व भूमिका शेखावत यांनी पटकाविला समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक रामनगर ग्रुप, द्वितीय क्रमांक कविता कुमरे ग्रुप व तृतीय क्रमांक पल्लवी सोनुले ग्रुप यांनी पटकाविला. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला एलआयसी व अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाउंडेशनचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण आनंदराव पावडे, कवडु पिंपळकर, रामदास देरकर, प्रा. आशिष देरकर, विठ्ठल टोंगे व शामकांत पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अंकिता काकडे, साक्षी पाचभाई व अनामिका शील यांनी केले. प्रास्ताविक भारती पिंपळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व महिलांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.