Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: मंगी बु. गावाला स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मंगी बु. गावाला स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार जिल्हास्तरावर निवड, गावाचे एकसंघ कार्य पाहुन तपासणी चमू गेली भारावून जिप मुख्य कार्यकारी अधिकार...

  • मंगी बु. गावाला स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार
  • जिल्हास्तरावर निवड, गावाचे एकसंघ कार्य पाहुन तपासणी चमू गेली भारावून
  • जिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली स्मार्ट ग्राम मंगी बु. येथे भेट
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु.) या गावाची आर.आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी जिल्हास्तरावर निवड झाली आहे. यामुळे गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, राजुरा गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी गावाची पाहणी व परीक्षण केले होते. आता त्याचा निकाल जाहीर झाला आहे.
गावात विविध विकासकामे, स्वच्छ रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या, बगीचे यामुळे गावाचे सौंदर्य खुलले आहे. सन 2012 पासून पहाटे दोन तासाची नियमित ग्राम स्वच्छता, पाण्याची पातळी वाढविण्यात गावाचा सहभाग याशिवाय अन्य शाश्वत विकास कामे यामुळे या गावाचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. गावात 100 टक्के करवसुली, 100 टक्के शौचालयाचा वापर, शुध्द पिण्याचे पाण्याच्या उपलब्धता, निमित पाणी तपासणी, गावात सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन व घरोघरी शोषखड्डे, उत्तम घनकचरा व्यवस्थापन, उत्तमसिजन पार्कची निर्मिती, ग्राम वाचनालय व कृषी संसाधन केंद्र, बंधिस्त व खुली व्यायामशाळा, 100 टक्के कोविड व नियमित लसीकरण, कुपोषण मुक्ती उपाययोजना, गळतीचे शून्य प्रमाण, शंभर टक्के जॉबकार्ड व कार्ड धारकांना 100 दिवस काम, सुकन्या समृध्दी योजना, जनधन योजना, बचत गट दशसुत्रीचे पालन, प्लास्टिक वापरास बंदी, एलईडी बल्बचा वापर, बायोगॅस सयंत्राचा वापर, लोकसंख्येच्या प्रमाणात चारपट म्हणजे आठ हजार वृक्ष लागवड, लोक सहभागातून जलयुक्त शिवार व पाणी पुनर्भरण, संगणकीकृत दाखल्यांचे वितरण, शंभर टक्के आधारकार्ड इत्यादी बाबीवर ग्रामस्थांनी नियोजनबद्ध कार्य केले. याविकास कार्यात अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. परिणामी सन 2021-2022 या वर्षातील आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत मंगी (बु.) ला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कार जाहीर होताच ग्रामस्थांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आमदार सुभाष धोटे, जिप माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जिप माजी कृषी सभापती सुनिल उरकुडे, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, पंस माजी सभापती मुमताज जावेद, कुंदाताई जेनेकर, पंस माजी उपसभापती मंगेश गुरनुले,  माजी जिप सदस्य मेघाताई नलगे, जेष्ठ समाजसेविका रजनीताई हजारे, माजी पंस सदस्य सुनंदाताई डोंगे, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, कार्यक्रम समन्वयक जितेंद्र बैस, सुभाष बोबडे यांनी गावाची वेगवेगळया माध्यमातून पाहाणी केली तेव्हाच या गावाला प्रथम पुरस्कार मिळवा यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 
या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सातत्याने गावाच्या विकास कार्यासाठी झटणारे राजुराचे तहसिलदार हरिष गाडे, मुलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी, राजुरा येथील गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, माजी गटविकास अधिकारी ओमप्रसाद रामावत, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी नगराळे, गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार, प्रशासक विजय परचाके (शिक्षण विस्तार अधिकारी),‍ माजी सरपंच रसिकाताई पेंदोर, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, माजी उपसरपंच वासुदेव चापले, शाळा व्यवस्थाप समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, पेसा समितीचे अध्यक्ष संगीता कोडापे, जिवनाबाई कोटनाके, सोनबत्तीताई मडावी, भिमराव पुसाम, संभाजी पा. लांडे, सचिव गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, मोहपतराव कुळमेथे, शंकर तोडासे, आनंदराव मडपती, सोमाजी कोडापे, गुलाब चव्हाण, गणपत कोडापे, रामशाव कन्नाके, प्रकाश वेडमे, गणपत चापले, प्रकाश चव्हाण, सुरेश आडे, रमेश कोडापे, वसंत सोयाम, लालशाव आत्राम, विनोद आत्राम, रवी कुळसंगे, माधव कुमरे, शरद पुसाम, भिमराव कन्नाके, बालाजी गेडाम, मनोहर मेश्राम, किसन कोडापे, रामचंद्र धुर्वे, बापुराव कोटनाके, मारोती कन्नाके, आबाजी साठोणे, भारत कोडापे, कविता मडावी, कांताबाई सुरपाम, शिल्पाताई कोडापे, दिनेश राठोड, नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, शैला मडावी, हर्षा तलांडे, बालाजी मुंडे व इतर सर्व ग्रामस्थांमुळे हा पुरस्कार मिळविण्यात यश आले असे ग्रामस्थांनी सांगितले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top