- सरकारी काम, अन... बारा महिने थांब
- अधिकाऱ्याच्या टेबल खाली बसले भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने
- नारंडा येथील तलावाचे सौंदर्यीकरणाचे अंदाजपत्रक बनविण्यास अधिकाऱ्यांकडून दिरंगाई
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
"सरकारी काम, अन... बारा महिने थांब" याच म्हणीचा प्रयत्न शासकीय कामांमध्ये येत असतो. सरकारी काम म्हटलं की नागरिकांना कामांकरिता वारंवार शासकीय कार्यलयाचे उंबरठे झिजवावे लागतात तरी सुद्धा त्यांचे काम काही होत नाही, त्यामुळेच नागरिकांच्या मनात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणाली बद्दल प्रचंड रोष असतो.
त्याच अनुषंगाने कोरपना तालुक्यातील नारंडा येथील तलावाच्या सौंदर्यीकरणासंदर्भातील अंदाजपत्रक बनविण्याबाबत विषय आहे. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी श्याम नारनवरे जिल्हा जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे वारंवार सदर कामाच्या मंजुरी करीता अंदाजपत्रक बनविण्याकरिता विनंती केली.त्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्या कनिष्ठ अधिकारी उपविभागीय जलसंधारण अधिकारी, उपविभाग राजुरा यांना यासंदर्भात तोंडी वजा लेखी आदेश दिले परंतु त्यांनीसुद्धा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखली.
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी वारंवार याबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडे मागील एक वर्षापासून याबाबत पाठपुरावा केला परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे तलावाच्या सौंदर्यीकरणाचे अंदाजपत्रक तयार होऊ शकले नाही.
दि. १२ एप्रिल २०२२ रोजी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने हे नेहमी प्रमाणे तलावाच्या अंदाजपत्रकरीता जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यासंदर्भात विचारणा केली असता उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्याकडून अद्यापही अंदाजपत्रक आपल्याकडे प्राप्त झाले नाही असे सांगण्यात आले, त्यामुळे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी टेबल खाली बसून त्यांना उपोषणाचा ईशारा दिला.
तेव्हा संपूर्ण कार्यलयात खळबळ माजली आणि २५ एप्रिल २०२२ पर्यत सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करू असे लेखी आश्वासन जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम नारनवरे यांनी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांना दिले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.