Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महाकाली मातेच्या दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाकाली मातेच्या दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी लाखों भाविकांनी घेतले महाकाली मातेचे दर्शन विविध स्वयंसेवी संस्था व दानशूर लोकांकडून होत आहे म...

  • महाकाली मातेच्या दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी
  • लाखों भाविकांनी घेतले महाकाली मातेचे दर्शन
  • विविध स्वयंसेवी संस्था व दानशूर लोकांकडून होत आहे महाप्रसादाचे वितरण
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
विदर्भातील आठ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या देवी महाकालीच्या यात्रेत लाखों भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. मागील दोन वर्षांत भाविक देवीच्या दर्शनाला येऊ न शकल्याने ही गर्दी वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विक्रमी लसीकरणानंतर कोरोनावर आळा मिळविल्यानंतर कोरोना संसर्ग कमी होऊ लागताच सरकारने निर्बंध हटविले. यात्रा आणि उत्सवांनाही परवानगी दिली. यातूनच देवी महाकालीच्या नवरात्रोत्सवास चैत्र शुक्ल षष्ठीला म्हणजे ७ एप्रिलला महाकाले परिवाराच्यावतीने परंपरागत विधिवत पूजा करून सुरुवात करण्यात आली.कोरोना संकटामुळे रद्द झालेली विदर्भातील प्रसिद्ध महाकाली यात्रा तब्बल दोन वर्षांनंतर भरत असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी आले. पहिल्या दिवसापासून भाविकांची गर्दी होऊ लागली. नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर आणि आंध्र प्रदेशातूनही यावर्षी भाविकांची अलोट गर्दी उसळली. 
चैत्र शुद्ध षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा सुरू झाली असली तरी शेवटच्या दिवशी गर्दी वाढली. १५ ते १८ एप्रिल या कालावधीत भाविकांच्या गर्दीचा आजवरचा विक्रम नोंदविला गेला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी 'जय हो महाकाली चांदावासिनी...' चा गजर केला. मंदिराच्या विश्वस्त आशा महाकाले यांनी महाआरतीनंतर गाभाऱ्यात स्थापन करण्यात आलेला देवीचा घट हलविला. दहीभात शिंपडले आणि यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू झाला.
१९ एप्रिलला यात्रा संपली तरी २४ एप्रिलपर्यंत भाविकांची वर्दळ मंदिर परिसरात कायम होती.
यंदाही यात्रेत पोतराज आकर्षणाचे केंद्र ठरले. 'आस अधुरी राहू नये म्हणून...' दोन वर्षे देवीच्या दर्शनाला येता आले नाही. यंदा संधी मिळताच आम्ही मातेकडे आलोत 'जगावर आलेले कोरोनाचे संकट नाहीसे होऊ दे, सर्वाना सुखी व निरोगी ठेव, पीक-पाणी होऊ दे.' अशी आराधना भाविक मातेकडे करीत आहे.
माता महाकाली मंदिरात नारायण सेवा 
श्री सत्य साई सेवा संघटनेच्या वतीने सत्य साई बाबाच्या आराधना दिवसाचे औचित्य साधून दि. 24 एप्रिल ला सत्य साई सेवा समिती चंद्रपुर तर्फे सकाळी एकादश रुद्र पारायण, नगरसंकीर्तन, भजन व आरती करण्यात आली. माता महाकाली मंदिरात यात्रे निमित्याने येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top