Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डेली कलेक्शन करणाऱ्या एजंटच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून लूटमार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डेली कलेक्शन करणाऱ्या एजंटच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून लूटमार 1 लाख 63 हजाराची रोकड लंपास आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स ब्रम्हपुरी - मध्य...

  • डेली कलेक्शन करणाऱ्या एजंटच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून लूटमार
  • 1 लाख 63 हजाराची रोकड लंपास
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
ब्रम्हपुरी -
मध्यम व लहान व्यापारी विविध बँका आणि पत संस्थेत दररोज काही ना काही रक्कम जमा करीत असतात. या करिता पत संस्था एजंटही नेमतात. हे एजंट दिवसभर उन्हा-पाण्यात मेहनत करून वसुली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात मात्र आजकल हेही काम जिकरी व जोखिमेचे झाले आहे. अश्याच एका एजंटच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याचा जवळची रक्कम लंपास केल्याची घटना उघडीस आली आहे. 
नियमित निधी गोळा करणाऱ्या एका आरडी एजंटवर पाळत ठेवत दोन लुटमारांनी दुचाकी ने येत डोळ्यात मिरचीची पूड फेकत एजंट जवळचे 1 लाख 63 हजाराची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळच्या समारास ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली. पोलिसांना एका आरोपीला पकडण्यात यश आले असून एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे. ब्रम्हपुरी शहरातील संजय देवाजी कुळसंगे हे सेंट्रल बँक व आयसीआय बँकेचे एजंट असून लहान-मध्यमव्यापाऱ्यांकडून दररोज रक्कम कलेक्शन करतात. नेहमीप्रमाणे शहरातील उराडे पेट्रोल पंपाजवळील मदरपेठ भागात कलेक्शन करत असताना दुचाकी वरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत त्यांच्या बॅगमधील 1 लाख 63 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top