Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मानवता हाच खरा धर्म - प्रेरित दिलीप सदावर्ते
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मानवता हाच खरा धर्म - प्रेरित दिलीप सदावर्ते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम वृद्धाश्रमातील आई -वडिलांच्या आशीर्वाद...

  • मानवता हाच खरा धर्म - प्रेरित दिलीप सदावर्ते
  • नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम
  • वृद्धाश्रमातील आई -वडिलांच्या आशीर्वादाने मन प्रसन्न झाले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा येथील चमुने राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक समिती नागपूर विभाग अध्यक्ष अल्का सदावर्ते व नेफडो चे चंद्रपूर जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी दिलीप सदावर्ते यांच्या मार्गदर्शनात विसापूर येथील भारतीय सेवा संस्था मातोश्री वृद्धाश्रमात भोजनदान, रस वाटप, निरमा पॉकेट वाटप, वृक्षप्रतिज्ञा आदींचे आयोजन करण्यात आले होते.
सदावर्ते दांपत्याचा मुलगा प्रेरित व सून अबोली यांच्या विवाहसोहळ्याला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेरित हा गुजरात राज्यातील भरूच मधे एका खाजगी कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहे. प्रेरित व अबोली यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्य आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो हे होते. प्रमुख अतिथी म्हणून दिलीप सदावर्ते, अल्का सदावर्ते, विजय जांभुळकर, सोमा मेश्राम, सिंधुताई आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षपूजन करण्यात आले. वृक्षप्रतिज्ञा माणिक उपलांचीवार यांनी म्हटली. तर पर्यावरण गीत गायन अल्का सदावर्ते व संच यांनी सादर केले. आभासी पद्धतीने प्रेरित व अबोली यांनी गुजरात येथून वृद्धाश्रमातील उपस्थितांशी संवाद साधला. मानवता हाच खरा धर्म असून मानव सेवा हिच ईश्वरसेवा आहे. माझ्या आई वडिलांनी व नेफडो चमुने हा उपक्रम घेऊन आम्हांला विवाह वाढदिवसाची अनोखी भेट दिली. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून नेफडो परिवाराचे आभार व्यक्त केले. तसेच वृद्धाश्रमातील आई वडिलांच्या आशीर्वादाने मन प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतंत्रकुमार शुक्ला यांनी केले. प्रास्ताविक अल्का सदावर्ते यांनी केले तर आभार दिलीप सदावर्ते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रजनी शर्मा, स्वाती देशपांडे, मेघा धोटे, राजश्री उपगन्लावार, स्वरूप झंवर, उमा देशपांडे, सुनीता कुंभारे, विलास कुंदोजवार, संगीता पाचघरे, वीणा देशकर, भास्कर करमरकर, मनीषा भाके, सौ. कुंदोजवार आदिसह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top