Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वर्धा नदीत ट्रक कोसळला चालकाचा जागीच मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वर्धा नदीत ट्रक कोसळला  चालकाचा जागीच मृत्यू डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी घुग्घूस - घुग्घूस येथून मुंगोली खाणी कडे कोळसा भरण्याकरित...

  • वर्धा नदीत ट्रक कोसळला 
  • चालकाचा जागीच मृत्यू
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
घुग्घूस -
घुग्घूस येथून मुंगोली खाणी कडे कोळसा भरण्याकरिता जाणारा ट्रक वर्धा नदीत कोसळला या अपघातात ट्रक चालकाचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची कोसळून चालक जाग्यावरच मरण पावल्याची घटना उघडकीस आली.
सूत्रानुसार दिनांक 24 एप्रिलच्या रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान ट्रक चालक भारत टेकाम वय 45 वर्ष रा. घुग्घूस हा वेकोली वणी क्षेत्राच्या मुंगोली खाणी कडे कोळसा भरण्याकरिता भरधाव वेगाने जात होता. अचानक वर्धा नदीच्या पुलावर त्याचे वाहणावरून नियंत्रण सुटले व वाहन वर्धा नदीत कोसळले यात त्याचा जागीच मृत्यु झाला. सदर बाब आज सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच ट्रक नं. MH 33 4236 ला काढण्याकरिता प्रयत्न सुरु केले. वेकोलिच्या क्रेन च्या साहाय्याने नदीतून ट्रक काढण्यात आला त्यातून मृतदेह ही काढण्यात आला. उत्तरेतर तपासणीकरिता मृतदेह चंद्रपुर सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे. या वर्धा नदीच्या पुलावर अनेक खड्डे पडले असुन कोळशाची वाहने वेगाने धावत असतात आजपर्यंत अनेक अपघात यापूलामुळे झाले असून लोकांचा नाहक जीव जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top