Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मालगाडीच्या खाली आल्याने एक इसम गंभीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लगाडीच्या खाली आल्याने एक इसम गंभीर आमचा विदर्भ - ब्युरो रिपार्ट्स ब्रम्हपुरी - ब्रम्हपुरी येथील रेल्वे फाटकाच्या जवळपास असणाऱ्या रेल्वे रुळ...

  • लगाडीच्या खाली आल्याने एक इसम गंभीर
आमचा विदर्भ - ब्युरो रिपार्ट्स
ब्रम्हपुरी -
ब्रम्हपुरी येथील रेल्वे फाटकाच्या जवळपास असणाऱ्या रेल्वे रुळावर मालवाहक रेल्वेच्या खाली आल्याने एक इसम गंभीर जखमी झाला ही घटना दि. २३ एप्रिलच्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. प्रकाश मंगरू कांबळी वय ४६ वर्ष रा. ब्रह्मपुरी असे गंभीर जखमी झालेल्या ईसमाचे नाव आहे. प्रकाश हा मालगाडी खाली आल्याने गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपरी येथे दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार दिनांक २३ एप्रिलच्या रात्री चंद्रपूर वरून गोंदिया कडे जाणारी मालगाडी जात होती. त्याच वेळेस मद्यधुंद अवस्थेत असणारा प्रकाश हा रेल्वे पटरी वरून जात असताना अचानक भरधाव वेगात येत असलेल्या मालवाहू रेल्वे गाडीच्या आवाजाने खाली कोसळला असता तो गंभीर जखमी झाला. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top