Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोळशाने भरलेल्या ट्रक ने घेतला पेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोळशाने भरलेल्या ट्रक ने घेतला पेट धानोरा-गडचांदूर मार्गावरील घटना धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - धानोरा गडचांदूर मार्ग...

  • कोळशाने भरलेल्या ट्रक ने घेतला पेट
  • धानोरा-गडचांदूर मार्गावरील घटना
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
धानोरा गडचांदूर मार्गावरील भोयगाव जवळ आज शनिवार दि. 9 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास कोळसा भरलेला ट्रक क्र. एमएच 40 बीजी 8090 ने अचानक पेट घेतला.
हा 12 चक्का ट्रक पोवनी 2 साखरी कोळसा खाणीतून 27 टन कोळसा भरून धरिवाल कंपनीत जात असतांना ट्रकचा टायर पंचर झाल्याने चालकाने ट्रक रात्री दरम्यान रस्त्यावर उभा केला. पहाटे दरम्यान अचानक आग लागल्याचे चालक दिलीप बंडी रा. बल्लारशाह यांना दिसले.
याबद्दल माहिती मिळताच भोयगावचे पोलीस पाटील यांनी हि माहिती गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांना दिली त्यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठविले पो. हवा. चरनदास मडावी, प्रभू मिमीलवाड, संदीप थेरे यांनी घटनास्थळ गाठले व दोन अग्निशमन दलाचे वाहन बोलाविले पाण्याचा मारा करून 10 वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील पोलीस तपास करीत आहे.
सचिन मेहरोलीया रा. बल्लारपूर यांचा मालकीचा हा ट्रक असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने कोळसा खाणीत कोळसा जळत असतो तो कोळसा भरून ट्रक जातो. भरलेल्या कोळश्या मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top