Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरातील शैक्षणिक परिसरात प्रस्तावित रेल्वे मालधक्क्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शहराबाहेरील पर्यायी जागेवर मालधक्का स्थलांतरित करण्याचा आग्रह आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०१ ऑगस्ट २०२६) -         राजुरा शहरातील ...
शहराबाहेरील पर्यायी जागेवर मालधक्का स्थलांतरित करण्याचा आग्रह
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०१ ऑगस्ट २०२६) -
        राजुरा शहरातील महामार्ग क्रमांक २६६ (राजुरा–आसिफाबाद मार्ग) वरील रेल्वे गेटलगत शैक्षणिक परिसरात प्रस्तावित रेल्वे मालधक्का उभारण्याच्या कामास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाने तीव्र विरोध दर्शवित उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी (एसडीएम) यांना सविस्तर जनहिताचे निवेदन सादर केले.

        राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभाग द्वारे सादर करण्यात आलेल्या निवेदनात, दक्षिण मध्य रेल्वेकडून रेल्वे गेटलगत सुरू असलेल्या मालधक्का उभारणीच्या कामामुळे भविष्यात विद्यार्थी, पालक, नागरिक, व्यापारी तसेच वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

        निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रस्तावित मालधक्का परिसरालगत शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल, आदर्श हायस्कूल, न्यू इरा इंग्लिश स्कूल, समाज कल्याण विभागाचे वसतिगृह, आयटीआय, टेक्निकल संस्था, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, इन्फंट जीसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल, कल्याण नर्सिंग कॉलेज, स्व. रामचंद्रराव धोटे कॉलेज आणि ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल यांसारख्या शैक्षणिक संस्था असून दररोज पाच हजारांहून अधिक विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात.
        राजुरा–आसिफाबाद हा महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा महत्त्वाचा आंतरराज्य मार्ग असून या मार्गावर आधीपासूनच मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यातच रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत याच ठिकाणी रेल्वे मालधक्का सुरू झाल्यास अवजड वाहनांची संख्या आणखी वाढून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मालधक्क्यामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण, आपत्कालीन सेवांना होणारा विलंब, परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन आणि शैक्षणिक वातावरणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

        या प्रकल्पाचा स्वतंत्र वाहतूक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम अभ्यास करण्यात यावा. स्थानिक नागरिक, पालक, शैक्षणिक संस्था आणि संबंधित विभागांच्या उपस्थितीत सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रस्तावित रेल्वे मालधक्का शहराबाहेरील योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने संविधानिक व लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)  जेष्ठ नेते मेहमूद मुसा, तालुका अध्यक्ष संतोष डेरकर, राजुरा विधानसभा अध्यक्ष अमोल राऊत, शहराध्यक्ष रकीब शेख, राहुल अंबादे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

#Rajura #RajuraNews #RailwayGoodsShed #RailwayProject #MaharashtraNews #NCP #AjitPawarNCP #StudentSafety #Education #TrafficIssue #SouthCentralRailway #AsifabadRoad #VidarbhaNews #ChandrapurNews #PublicInterest #BreakingNews #LocalNews #Maharashtra #RailwayNews #RajuraAsifabadRoad

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top