Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १ हजार ८ भजन मंडळांचा भव्य भजन महोत्सव घेणार - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१ हजार ८ भजन मंडळांचा भव्य भजन महोत्सव घेणार - आ. किशोर जोरगेवार राम नवमी निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध भाषिय चार दिवसीय 100 भजन...

  • १ हजार ८ भजन मंडळांचा भव्य भजन महोत्सव घेणार - आ. किशोर जोरगेवार
  • राम नवमी निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध भाषिय चार दिवसीय 100 भजन मंडळांचे भजन महोत्सव
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शहराच्या विकासकामांसाठी मोठा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. सोबतच क्रीडा, सांस्कृतीक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने काम करत आहोत. आध्यात्माकडुन दुरावत चाललेल्या समाजाला भजन किर्तनातून आध्यामाचे महत्व आणि त्याचे फायदे याबात जनजागृतीचे काम आपल्या वतीने भजन महोत्सवाच्या माध्यमातुन केल्या जात आहे. येत्या काळात १  हजार ८ विविध भाषिय भजन मंडळांच्या भव्य भजन महोत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विवेक नगर येथे राम नवमी निमित्य विविध भाषिय चार दिवसीय 100 भजन मंडळांच्या भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भजन महोत्सवाच्या दुस-या दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी भजन महोत्सवाला भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता,  चंद्रशेखर देशमुख, विश्वजित शाहा, करणसिंह बैस, देवा कुंटा, भाग्यश्री हांडे, आशा देशमुख, वैशाली मेश्राम, कल्पना शिंदे, नितीन शाहा, मुन्ना जोगी, तिरुपती कलगुरुवार, राकेश पिंपळकर, सायली येरणे, सविता दंडारे, हेरमन जोसेफ, गोपी मित्रा, प्रतिक हजारे, विमल कातकर, हेमलता पोईनकर, चंदा ईटनकर, अस्मिता डोनारकर, नीलिमा वनकर, आनंद रणशूर आदिंची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top