Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धार्मिक सण शांतता व सुव्यवस्था राखून नियमांचे पालन करीत साजरे करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धार्मिक सण शांतता व सुव्यवस्था राखून  नियमांचे पालन करीत साजरे करा पोलिस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी जनतेला केले आवाहन धनराजसिंह शेखावत - आम...

  • धार्मिक सण शांतता व सुव्यवस्था राखून  नियमांचे पालन करीत साजरे करा
  • पोलिस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी जनतेला केले आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजान हे धार्मिक सण शांतता व सुव्यवस्था राखून, नियमांचे पालन करत उत्स्फूर्तपणे साजरे करावे. मिरवणुकीत डी. जे. चा वापर करू नये, कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी समाजसेवकांनी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.
याप्रसंगी नगर परिषदेच्या अध्यक्षा सविताताई टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, प्रामुख्याने उपस्थित होते. शांतता समितीच्या सदस्यांनी विविध विषयावर पोलीस निरीक्षक आमले यांच्याशी चर्चा करत समस्या मांडल्या, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. सभेला विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, सभापती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top