Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आदिवासी शेतमजुराचा संशयास्पद मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
BREAKING NEWS आदिवासी शेतमजुराचा संशयास्पद मृत्यू  राजुरा तालुक्यातील केळझर येथील घटना अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरुर स्टेशन (...

  • BREAKING NEWS
  • आदिवासी शेतमजुराचा संशयास्पद मृत्यू 
  • राजुरा तालुक्यातील केळझर येथील घटना
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर स्टेशन (राजुरा) -
नवेगाव चिचाळा रस्त्याच्या कडेला एका 47 वर्षीय अदिवासी शेतमजुराचा संशयास्पद मृत्यूदेह आढळल्याने परिसरात एकाच खळबळ माजली असून यात घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू या विषयी नागरिक चर्चा करताना दिसून येत आहे ,
यात सविस्तर असे की राजुरा तालुक्यातील केळझर येथील हनामांतू माणकू मडावी वय 47 वर्ष हा विरुर येथील गोहणे यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करीत होता, गुडीपडव्याला त्याचा वार्षिक हिसाब झाला होता, तेव्हापासून तो सतत रोज अतिमद्य प्राशन करीत होता, कालही तो विरूर स्टेशन येथून मद्य प्राशन करून सायंकाळच्या सुमारास आपल्या गावाला सायकल ने गेला मात्र आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास काही शेतकऱ्यांना तो चिंचळा नवेगाव या रोडवर पडून दिसला तेव्हा पोलीस पाटलांनी तात्काळ याची माहिती विरुर पोलिसांना दिली तेव्हा ठाणेदार चव्हाण यांनी आपल्या चमुसह घटनेस्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा केला आकस्मिक मृत्यू च नोंद करून उत्तरीय तपासणीसाठी मृत्यूदेह राजुरा येथे पाठविण्यात आले.  
या संदर्भात पोलिसांना विचारणा केले असता शरीरावर कुठल्याही प्रकारची घाव नाही किंवा व्रण नाही मृतक हा अति मद्य प्रशन करून किंवा उष्माघात ने दगावला असेल असा प्राथमिक अंदाज वर्तविला मात्र वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच खरं कारण समोर येईल असे सांगण्यात आले. विरुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद करून मर्ग दाखल केला व पुढील तपास ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नरगेवर, विजू मुंडे, अशोक मडावी व खंडारे हे करीत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top