Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अखेर... शिर नसलेल्या निर्वस्त्र युवतीच्या मृतदेहाची ओळख पटली..!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अखेर... शिर नसलेल्या निर्वस्त्र युवतीच्या मृतदेहाची ओळख पटली..! स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांना यश.......! संशयित आरोपी पोलिसांच्या रड...

  • अखेर... शिर नसलेल्या निर्वस्त्र युवतीच्या मृतदेहाची ओळख पटली..!
  • स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांना यश.......!
  • संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर
सौ. मनीषा शर्मा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
भद्रावती -
भद्रावती तेलवासा रस्त्यालगतच्या सुमठाणा शेत शिवारात एका अनोळखी 25 वर्षीय युवतीचे निर्वस्त्र अवस्थेत व गळा कापून मुंडके नसलेला मृतदेह सोमवार दिनांक 4 एप्रिलच्या सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास अमोल झाडे नामक शेतकऱ्याला आढळून आल्याने त्यांनी या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तोपर्यंत या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी गर्दी केली असता शहर व परिसरात एकच खळबळ उडाली सदरील युवतीचे मुंडके गायब असुन तिच्या शरीरावर कोणतेही वस्त्र नसल्याची प्रत्येक्षदर्शनी पाहणाऱ्या नागरिकांनी सांगितले. भद्रावती पोलिसांनी मृत युवतीच्या आजूबाजूला जुती, हेडफोन,पैसे व ईतर चिल्लर सामान आढळून आले ते पोलिसांनी जप्त केले. याची सखोल तपासणी पोलिसांनी केली मात्र मुंडके आढळून आले नाही.पुरावे नष्ट करण्यासाठी मुंडके गायब केले असावे असा तर्क लावण्यात येत आहे.याची तक्रार फिर्यादी अमोल झाडे (35) रा गवराळा यांनी पोलीस स्टेशन भद्रावती येथे दाखल केली असता पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 302,201अन्वये गुन्हा दाखल केला करून चौकशी सुरु केली. चंद्रपर जिल्हयात अनेक ठिकाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला, पोलीस स्टेशन येथे राजकीय पक्ष्यातर्फे निवेदन देऊन आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.परंतु ती युवती कुठली आहे, तीचे नाव काय आहे, कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये मिसींग केस आहे का याबाबत पोलिसांनी प्रयत्न केले तसेच भद्रावतीचे ठाणेदार गोपाल भारती यांनी शोध पत्रिका तयार करुन मीडियाला व सर्व पोलीस स्टेशनला दिली.पत्रकरांनी वर्तमान पत्रात व पोर्टला बातम्या प्रकाशित केल्या तरी यशयेत नव्हते व पोलिसांवर दबाव वाढत होता. यातच गोपनीय माहितीच्या आधारे त्या युवतीचा अमनध्वनी प्राप्त करुन तीचे राहते घर नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे असल्याचे निष्पण झाले. त्यावरून तीच्या मोठ्या बहिणीशी संपर्क साधुन ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. व तिच्या शरीरावरील वर्ण व वापरातील वस्तू पाहून मृतक युवती ही तीची लहान बहीण असल्याची खात्री झाली. सदर युवती स्वतंत्र राहत असल्यामुळे ती बेपत्ता आहे किंवा तीच्या सोबत अशी काही घटना घडली याबाबत कुटूबियांना माहिती नसल्याने पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली नसल्याचे सांगितले. या प्रकरणात काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असुन लवकरच आरोपी पिंजऱ्यात अडकणार आहे. या गुन्ह्यातील आरोपी शोधण्याचे काम भद्रावती पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेलचे पथक करीत आहे. तसेच पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि. जितेंद्र बोबडे, सपोनि.संदीप कापडे पोउनि. अतुल कावळे, भद्रावतीचे ठाणेदार गोपाल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार, सायबर सेलचे तज्ञमुजावर अल्लीराहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, वैभव पत्तीवार,उमेशरोडे व संतोष पानघाटे यांनी मृतदेहाची ओळख पटविण्याची कामगिरी केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top