Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिद्दीच्या जोरावर ललिता बनली "न्यायाधीश"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिद्दीच्या जोरावर ललिता बनली "न्यायाधीश" राजुरा तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - ...
  • जिद्दीच्या जोरावर ललिता बनली "न्यायाधीश"
  • राजुरा तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
मनात जिद्द व ध्येयप्राप्तीची इच्छाशक्ती असेल तर संकटावर मात करन सर्वकाही साध्य करता येते.अशाच एका ध्येयवेड्या मुलीने निरंतर अभ्यास व ध्येय डोळ्यासमोर ठेवून यश संपादन केले आहे. ललिता ताराचंद्र टाकभौरे या सामान्य कुटुंबातील मुलीने जिद्दीच्या जोरावर न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.तिच्या या यशाने बामनवाडा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिने हे यश लग्नानंतर संसार सांभाळून प्राप्त केल्याने तिची ही गगन भरारी होतकरू मुलीसाठी प्रेरणादायी ठरू पहात आहे.
ललिता टाकभौरे ही सामान्य कुटुंबातील मुलगी.आपल्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान व्हावे असे तिच्या आईवडिलांचे स्वप्न होते. आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ललिताने मनाशी निश्चय केला. विधी शाखेत शिक्षण घ्यावे याकरीता वडिलांनी प्रोत्साहन दिले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातुन तिने एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने कधीही मागे फिरून पाहिले नाही.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात एलएलएम मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. आता तिने न्यायाधीशपदाच्या परीक्षेत राज्यातुन १३ वारँक मिळवित ऊत्तीर्ण झाली आहे.
विशेष म्हणजे, लग्नानंतर मुली संसारात रमून जात असतात. पण ललिता अपवाद ठरली आहे. तिने संसाराचा गाडा हाकलत शिक्षणाकडे लक्ष दिले. पती सरज करमणकर यांनी सुध्दा तिला मदत केली. सामान्य कुटुंबातील तिची ही यशप्राप्ती अनेकांना प्रेरणा देणारी ठरू पहात आहे. शिक्षणाची आवड, जिद्द, निरंतर अभ्यास व ध्येयप्राप्तीची इच्छाशक्ती असेल तर येणाऱ्या संकटावर मात करता येते व उंच शिखर गाठता येते हे ललिताने दाखवून दिले आहे. तिच्या या यशाने टाकभौरे व करमणकर कुटुंब भारावून गेले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top