Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दगडाने डोके ठेचून दोघांची हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दगडाने डोके ठेचून दोघांची हत्या आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलिस उपविभागांतर्गत गट्टा पोलिस मदत के...
  • दगडाने डोके ठेचून दोघांची हत्या
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचिरोली -
एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलिस उपविभागांतर्गत गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी दोन युवकांची दगडाने डोके ठेचून हत्या केली. अशोक नरोटे वय 28 रा.गोरगुहा व मंगेश हिचामी वय 27 रा. झारेवाडा अशी मृतांची नावे आहेत. नक्षल्यांनी केलेल्या हत्या मधील एक ग्रामस्थ मंगेश हिचामी हा झारेवाडा येथील असून अशोक नरोटे हा आत्मसमर्पित नक्षलवादी होता अशी माहिती पोलिसांनी
दिली.
पोलीस मदत केंद्र गट्टा (जां) हद्दीमध्ये दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी मंगेश मासा हीचानी वय 27 रा. झारेवाडा पो. गट्टा (जां) ता. एटापल्ली जि. गडचिरोली व नविन पेका नरोटे वय 25 रा. गोरगुट्टा पो. गट्टा (जां) ता. एटापल्ली या दोन निरपराध आदिवासी युवकांची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी क्रूर हत्या केली.
नक्षलवाद्यांनी मंगेश हिचामी यास दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी रात्री 10.00 वाजता व नविन नरोटे यांस रात्रो 01.00 वाजता घरातुन बळजबरीने घेवुन गेले व त्यांची हत्या केली. या दोघांच्याही हत्येनंतर मंगेश हिचामी याचे मृतदेह झारेवाडा ते गट्टा रोडवर आणुन ठेवले तर नविन नरोटे याचे मृतदेह गोरगुट्टा ते गिलनगुडा रोडवर आणुन ठेवले होते. या दोघांचे मृतदेह त्यांच्या गावापासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. 
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नक्षल्यांची शोध मोहिम सुरु केली आहे. यासाठी पोलिसांनी कुमक वाढवली आहे. गडचिरोली येथील सुरजागड लोहखनिज टेकड्यांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top