- गोवंश तस्करीचा प्रयत्न विहिंप व बजरंगदलच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला
- जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या गाडीवर पोलिसांची धाड
- आयशर वाहन, 21 बैल आणि दोन चाकूसह 10 लाखाचा मुद्देमाल जप्त
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्यातून नुकत्याच काही दिवसापासून अवैधरित्या कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाणारे दलालांची साखळी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. ट्रक आणि आयचर वाहनाने मोठ्या संख्येने गोवंश तस्करी राजुरा-आसिफाबाद मार्ग आणि कोठारी-तोहोगाव-लाठी-विरूर-कोष्टाला-लक्कडकोट मार्गे जोमाने सुरु आहे. बल्लारपूरहुन राजुरा मार्गाने तेलंगणा येथे गोवंश तस्करी करणाऱ्या आयचर वाहनाला धरून गोवंश तस्करीचा प्रयत्न विहिंप व बजरंगदलच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेतले असून गोवंशची सुटका केली आहे.
विहिंप व बजरंगदलच्या कार्यकर्त्यांना आयचर वाहनाने बल्लारपूरहुन राजुरा मार्गाने तेलंगणा येथे गोवंश तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. सकाळी ८ वाजता पोलिसांनी स्थानिक पंचायत समिती चौक येथे नाकाबंदी करत सदर आयशर वाहन क्र. TS-20 T-1752 थांबविले. वाहनाची झडती घेतली असता त्यात 21 बैल गाडीच्या मागच्या डाल्यामध्ये आखूड दोरीने कोंबून बैलांना ईजा होईल अशा स्थीतीत बांधून असल्याचे आढळले, बैलांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तली करीता वाहतुक करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी वाहनाच्या कॅबीनची झडती घेतली असल्यास त्यात एक लोखंडी ऑटोमॅटिक चाकू आणि एक साधारण चाकू आढळून आला. पोलिसांनी विचारणा केली असता सदर बैल जिवती तालुक्यातील भाईपठार येथील मोबीन मदार शेख वय 23 वर्ष याचे असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याला ताब्यात घेते वाहन चालक मारोती उरकुडा कोल्हे वय 37 वर्ष रा आसीफाबाद यास हि ताब्यात घेतले आहे.
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी 21 बैल प्रत्येकी किमंत 10 प्रमाणे 2 लाख 10 हजार, आयचर वाहन किंमत 8 लाख व दोन चाकू असा एकूण 10 लाख 10 हजाराचा माल जप्त केला. आरोपींविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम 5(अ),(ब),9,11 महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा 1976 सुधारणा सण 2015 सहकलम 11(1)(ड)(च)(ट) प्राणांना निर्दयतेने वागवण्याचा कायदा 1960 व 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला. समोरील तपास पोलीस करीत आहे.
मात्र अश्या एकाच कार्यवाहीने गोवंश तस्करीला आळा बसणार नसून राजुरा-आसिफाबाद मार्ग आणि कोठारी-तोहोगाव-लाठी-विरूर-कोष्टाला-लक्कडकोट मार्गे गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनांवर पोलिसांसह प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी अशी मागणी विहिंप व बजरंग दलाकडून करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.