- शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे वॉलकंपाउंडची भिंत पडतात तेव्हा...
- ग्रापं सदस्य रमेश झाडे यांच्या प्रयत्नाने दोन घरांच्या मधात फसलेल्या चार गायींना जीवनदान
- बघा व्हिडीओ....
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गावोगावी व्हावी गो-उपासना, गोसेवा, गोदुग्ध मंदिर स्थापना...
रुची लावावी थोर लहान, गो दुग्धाची परोपरी...
सर्व करावे जे जे करणे, परी सुधारावे सात्विक खाणे...
त्या वाचोनि सद्बुद्धि येणे, कठीण वाटे...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या पंधराव्या अध्यायात गोवंश सुधारविषयक विचार मांडले आहे. गायीचे महत्व पटवून देतांना धार्मिक कारणापेक्षा गोवंश शेतीसाठी व आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे, असे विचार त्यांनी ग्रामगीतेत परखड पणे मांडले आहे. एकीकडे आपले गोवंश कसायाला देणारे महाभागही समाजात आहेत तर गोवंशाच्या रक्षणाकरिता काहीही करण्याची हिम्मत ठेवणारेही समाजात आहेत.
आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान रामपूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पाटील व त्यांच्या घराशेजारील एका घराच्या मधातल्या दीड फुटाच्या गल्लीत चार गायी फसल्या. वॉर्डातील लोकांनी फसलेल्या गायींना बघताच गोंधळ केला. गायींना बाहेर कसे काढावे असा प्रश्न ग्रामस्थानसोबतच ग्रामपंचायतीचा कर्मचाऱ्यांना पडला. वॉलकंपाउंडच्या मध्ये फसलेल्या गायी गोंधळून गेल्या होत्या. फसलेल्या गायी काढायचा कश्या असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला. काही ग्रामस्थ गायी काढण्याचे प्रयत्न करीत होते. हि बाब शिवसेना उपतालुका प्रमुख व ग्रापं सदस्य रमेश झाडे याना माहित होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. "गोधनाच्या संरक्षणासाठी साठी वाट्टेल ते" म्हणत त्यांनी चक्क वॉलकंपाउंडची भिंतच तोडून टाकली व दोरी ने गायीच्या पायाला बांधत सर्व गोधन सुखरूप बाहेर काढले. याकामात रमेश झाडे याना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीही भरपूर मदत केली. यावेळी सरपंच वंदना गौरकर, जगदीश बुटले, हेमलता ताकसांडे हे हि उपस्थित होते. गायींना सुखरूप बाहेर काढल्यामुळे ग्रामस्थ रमेश झाडे यांचे सह याकार्यात मदत करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.